गणपतीची पहिल्यांदाच घरी स्थापना करणार आहात? लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी
Ganesh Chaturthi 2024 : गणपतीची पूजा केल्याने घरात केवळ सुख-समृद्धी नव्हे तर ज्ञानाचीही प्राप्ति होते. अशातच यंदा पहिल्यांदाच घरी गणपती बाप्पाची स्थापना करणार असल्यास काही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
| Published : Aug 31 2024, 03:08 PM IST / Updated: Aug 31 2024, 03:15 PM IST
- FB
- TW
- Linkdin
गणेशोत्सव 2024
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला अत्यंत महत्व आहे. या महिन्यात काही प्रमुख सण उत्सव साजरे केले जातत. यापैकीच एक म्हणजे गणेशोत्सवाचा सण आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाचा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाचा सण 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यावेळी घरोघरी बाप्पाची स्थापना केली जाते. गणपतीची दहा दिवसात विधिवत पूजा करण्याचे फार महत्व आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. अशातच तुम्ही पहिल्यांदाचा गणपती बाप्पाची घरी स्थापना करणार असाल तर काही नियम आणि गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
या गोष्टींची घ्या काळजी
गणेशोत्सवावेळी गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. गणपतीच्या मुर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी. अशा मुर्तीची स्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक असलेला असावा.
मुर्तीची स्थापना करण्याची योग्य दिशा
गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्याची दिशा ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व दिशा) असावी. तर मुर्तीचे मुख उत्तर दिशेला असावे. याशिवाय मुर्तीची स्थापना स्वच्छ ठिकाणी करावी.
पूजा विधी
गणपतीची स्थापना केल्यानंतर गोमूत्र, गंगाजल शिंपडा. यानंतर गणपतीवर अक्षता वाहा. गणपतीसोबत रिद्धी-सिद्धीची स्थापना करणे शुभ मानले जाते. मुर्तीच्या डाव्या बाजूला कलशात जल भरुन ठेवा. यानंतर हातात अक्षता आणि फुलं घेऊन गणपतीची पूजा करा.
नैवेद्य आणि पूजा
गणपतीची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवा. नैवेद्यात खासकरुन मोदक नक्की असावा. अखेर गणपतीच्या मंत्रांचा जाप आणि आरती करुन पुजा संपन्न करा.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला दारापुढे काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी डिझाइन
Ganesh Chaturthi 2024 : शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ घ्या जाणून