सार
भारतात मधुमेहाच्या रुग्णांचा आकडा 10 कोटींच्या पार गेला आहे. याशिवाय प्री-डायबिटीजच्या रुग्णांचा आकडा 13 कोटींहून अधिक आहे. अशातच नव्या शोधानुसार तुम्हाला सातत्याने जंक फूड जसे की, चिप्स, कुकीज असे पदार्थ खाण्यास आवडत असल्यास वेळीच सावध व्हा.
Health Care : भारतात मधुमेहाने पीडित असणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन आणि इंडियन कॉउंसिल ऑफ मेडिकलने केलेल्या रिसर्च द्वारे वर्ष 2023 मध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासातून भारतात जवळजवळ 101 दशलक्ष नागरिक मधुमेहाचा सामना करत आहेत. याशिवाय 136 दशलक्षजण प्री-डायबिटीजचे रुग्ण आहेत.
25 ते 45 वयोगटातील व्यक्तींवर अभ्यास
अभ्यास 25 ते 45 वयोगटातील व्यक्तींमधील ज्यांचा बॉडी इंडेक्स 23 आणि 38 पेक्षा अधिक वजनासह लठ्ठ वयस्कर व्यक्तींवर करण्यात आला होता. संशोधकांनी असे म्हटले की, चिप्स, कुकीज, तळलेले पदार्थ, मेयोनीज आणि प्रोसेस्ड फूडसारख्या पदार्थांमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढला जातो.
Advanced Glycation End Products (AGEs) युक्त खाद्य पदार्थ मधुमेहाचा धोका वाढवतात. अशाप्रकारचे पदार्थ उच्च तापमानावर तयार केले जातात. खासकरुन प्रोसेस्ड फूड अथवा तळलेले पदार्थ. यामुळे सूज येणे, इंसुलिन वाढणे आणि अन्य आरोग्यासंबंधित समस्या वाढल्या जातात. अशातच व्यक्तीमध्ये मधुमेहाचा धोका वाढला जातो.
खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे
संशोधकांनुसार, अत्याधिक वजन आणि लठ्ठ व्यक्तींनी फळ, भाज्या, कडधान्ये आणि कमी वसा असणारे डेयरी प्रोडक्ट्सचा आपल्या खाण्यापिण्यात समावेश करावा. याशिवाय अत्याधिक तणावाच्या स्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
AGEs युक्त खाद्य पदार्थ कोणते
चिप्स, फ्राइड चिकन, समोसा, बेक्ड पदार्थ, कुकीज, केक, प्रोसेस्ड फूड, बेकन, बीफ, चिकनसह ग्रिल्ड किंवा तळलेले नॉन-व्हेज पदार्थ.
आणखी वाचा :