पाणीपुरी खाण्याची आवड असल्यास घरच्याघरी त्याच्या पुऱ्या तयार करू शकता. पण पुऱ्या तळताना फुगत नाही अशी बहुतांश महिलांची तक्रार असते. यासाठीची सोप्या ट्रिक्स पाहूया.
फुगीर आणि कुरकुरीत पुरी तयार करण्यासाठी सर्व सामग्री योग्य प्रमाणात घ्यावी. यासाठी 1 कप रव्यामध्ये 2 चमचा मैदा आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला.
पीठ व्यवस्थितीत मळून घेतल्याने पाणीपुरीच्या पुऱ्या मस्त फुलल्या जातात.
टम्म-फुगीर पुऱ्या होण्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर थोडावेळ तसेच ठेवून द्या.
पाणीपुरीच्या पुऱ्या तळण्यासाठी तेल अधिक गरम नसावे. अन्यथा पुऱ्या फुगीर होण्याएवजी चपट होतील.
पुऱ्यांसाठी पीठ पातळ लाटा. जाड लाटल्यास पुऱ्या कुरकुरीत आणि फुगीर होणार नाहीत.
पुऱ्या तेलात तळताना चमच्याने हलक्या हाताने दाबून पाहा. यामुळे पुऱ्या फुलल्या जातात.