July Festival Calendar 2024 : जुलैमध्ये तीन एकादशींचा शुभ योग, जाणून घ्या महिन्याभरात साजरे होणाऱ्या सणवारांची लिस्ट

| Published : Jul 02 2024, 10:20 AM IST

July Festival Calendar 2024
July Festival Calendar 2024 : जुलैमध्ये तीन एकादशींचा शुभ योग, जाणून घ्या महिन्याभरात साजरे होणाऱ्या सणवारांची लिस्ट
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

July Vrat Tyohar 2024 : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या देखील महिन्यात काही सणवार साजरे होणार आहेत. याशिवाय याच महिन्यात तीन एकादशींचा शुभ योग देखील आला आहे.

July Festival Calendar 2024 : यंदाच्या वर्षातील जुलै महिना व्रत-सणवारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. जुलै महिन्यापासूनच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्राव्यस्थेत जातात. या कालावधीत संपूर्ण सृष्टीचे पालन भगवान शंकरांकडून केले जाते. अशातच जाणून घेऊया जुलै महिन्यात कोणते सणवार साजरे केले जाणार याबद्दल सविस्तर.....

जुलै 2024 महिन्यातील सणवार

  • 2 जुलै 2024 (मंगलवार) - योगिनी एकादशी
  • 3 जुलै 2024 (बुधवार) - प्रदोष व्रत (कृष्ण), संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी
  • 4 जुलै 2024 (गुरुवार) - मासिक शिवरात्रि
  • 5 जुलै 2024 (शुक्रवार) - दर्श अमावास्या
  • 6 जुलै 2024 (शनिवार) - आषाढ मासारंभ
  • 7 जुलै 2024 (रविवार) - जगन्नाथ रथ यात्रा
  • 9 जुलै 2024 (मंगलवार) - विनायक चतुर्थी
  • 17 जुलै 2024 (बुधवार) - देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपुर यात्रा, चातुर्मास्यारंभ
  • 19 जुलै 2024 (शुक्रवार) - प्रदोष व्रत (शुक्ल)
  • 20 जुलै 2023 (शनिवार) - साईबाबा उत्सव प्रारंभ-शिर्डी
  • 21 जुलै 2024 (रविवार)- गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा
  • 24 जुलै 2024 (बुधवार)- संकष्ट चतुर्थी
  • 31 जुलै 2024 (बुधवार) - कामिका एकादशी

जुलै महिन्यातील तीन एकादशी महत्वाच्या
जुलै महिन्यात तीन एकादशींचा शुभ योग होत आहे. यामध्ये आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी (Yogini Ekadashi), देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) आणि कामिका एकादशीचा (Kamika Ekadashi) समावेश आहे. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा शयनकाळ सुरु होतो. हा दिवस अत्यंत खास असतो. देवशयनी एकादशीपासूनचे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्ये केली जात नाही. असे मानले जाते की, त्या कार्यांमध्ये भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही.

आणखी वाचा : 

योगिनी एकादशीला चुकूनही करु नका हे काम, श्रीहरि होतील नाराज

Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दाखवा हा नैवेद्य, पैशांसंबंधित समस्या होतील दूर