MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Daily Shampoo : रोज शॅम्पू केल्याने केस गळतात का? जावेद हबीब यांनी सांगितली सिक्रेट्स

Daily Shampoo : रोज शॅम्पू केल्याने केस गळतात का? जावेद हबीब यांनी सांगितली सिक्रेट्स

चांगल्या आरोग्यासाठी आपण रोज आंघोळ करतो. अनेक जण रोज डोक्यावरून आंघोळ करतात. पण रोज केसांना शॅम्पू लावणं खरंच योग्य आहे का? यामुळे केस गळतात का?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 05 2026, 06:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांचा सल्ला
Image Credit : Getty

प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांचा सल्ला

रोज शॅम्पू लावून केस धुतल्याने ते गळतात, असा आपला समज असतो. याच भीतीने अनेक जण आठवडाभर केस धुत नाहीत. पण प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यावर वेगळंच उत्तर देतात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी नेमकं काय गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
शॅम्पू वापरल्याने केस गळतात का?
Image Credit : Getty

शॅम्पू वापरल्याने केस गळतात का?

जावेद हबीब सांगतात की, मजबूत केसांसाठी टाळूची (स्कॅल्प) स्वच्छता खूप महत्त्वाची असते. डोक्यावर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषण सतत साचत असतं. तुम्ही खूप दिवस केस धुतले नाहीत, तर केसांच्या वाढीवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शॅम्पूमुळे केस गळतील या भीतीने केस न धुणं चुकीचं आहे. गरजेनुसार केस नियमित धुतले पाहिजेत.

Related Articles

Related image1
Onion Black Mold : कांद्यावरची काळी बुरशी खावी की फेकून द्यावी? जाणून घ्या सत्य
Related image2
Hair Care : लांबसडक केसांचं रहस्य उलगडलं, घरीच तयार करा हे खास तेल
35
दात घासण्याइतकीच महत्त्वाची सवय
Image Credit : Getty

दात घासण्याइतकीच महत्त्वाची सवय

रोज शॅम्पू केल्याने केसांच्या वाढीवर परिणाम होतो का? या प्रश्नावर हबीब यांनी सोप्या भाषेत उत्तर दिलंय. ते म्हणतात, आपले केस आणि टाळू नेहमी स्वच्छ असायला हवेत. सकाळी उठल्यावर आपण जसे दात घासतो आणि चेहरा धुतो, तशीच काळजी आपण केसांचीही घ्यायला हवी.

45
जावेद हबीब यांच्या खास टिप्स
Image Credit : Getty

जावेद हबीब यांच्या खास टिप्स

  • धूळ, उष्णता, प्रदूषण आणि घामामुळे केसांमध्ये घाण साचते.
  • ही घाण साचून राहिल्यास केसांचं आरोग्य बिघडतं.
  • गरजेनुसार केस नियमित स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
  • तुम्ही थोडा साबण, शॅम्पू किंवा रिठा वापरू शकता.
  • शॅम्पू किती प्रमाणात वापरतोय, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
  • केस चांगले ओले करा आणि तुमच्या आवडीचं तेल लावा.
  • केसांसाठी कोणत्याही महागड्या तेलाची गरज नसते.
  • केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचं तेल खूप फायदेशीर ठरतं, असा सल्ला त्यांनी दिलाय.
55
केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं?
Image Credit : AI

केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं?

जावेद हबीब यांच्या मते, केस ओले केल्यानंतरच त्यांना तेल लावायला हवं. तुमचे केस खूप लांब असतील, तर ते हलक्या हाताने विंचरा. तेल लावल्यानंतर पाच मिनिटे थांबा आणि मग केस स्वच्छ धुवा. केस धुण्यासाठी महागड्या शॅम्पूची अजिबात गरज नाही. तुम्ही रोजचा साधा शॅम्पू वापरला तरी चालतो. पण केसांची स्वच्छता राखणं सर्वात महत्त्वाचं आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Late Night Scrolling : रात्री 10 नंतरही तुम्ही फोन सोडत नाही का? मग हे नक्की वाचा
Recommended image2
Mental Health : मानसिक आरोग्य सुधारायचंय? मग रोजच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश
Recommended image3
Rakul Preet Singh : इन्कम टॅक्स धाडीशी माझा काहीही संबंध नाही, रकुल प्रीत सिंगचा संताप
Recommended image4
Earbuds Health Risks : इयरबड्स वापरताय? मग या गोष्टी नक्की माहिती असायला हव्यात
Recommended image5
Zircon Nose Rings : तरुणींच्या लूकला चार चाँद लावतील या ६ ट्रेंडी डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Onion Black Mold : कांद्यावरची काळी बुरशी खावी की फेकून द्यावी? जाणून घ्या सत्य
Recommended image2
Hair Care : लांबसडक केसांचं रहस्य उलगडलं, घरीच तयार करा हे खास तेल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved