MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Onion Black Mold : कांद्यावरची काळी बुरशी खावी की फेकून द्यावी? जाणून घ्या सत्य

Onion Black Mold : कांद्यावरची काळी बुरशी खावी की फेकून द्यावी? जाणून घ्या सत्य

कांद्यावर दिसणारी काळी बुरशी नक्की काय असते? असा कांदा खावा की फेकून द्यावा? याचा जीवघेण्या 'ब्लॅक फंगस'शी काही संबंध आहे का? याबद्दलची अधिकृत आणि महत्त्वाची माहिती.

3 Min read
Author : Karishma R
Published : Sep 29 2026, 05:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कांद्यावरील काळी बुरशी
Image Credit : pinterest

कांद्यावरील काळी बुरशी

आपल्या रोजच्या जेवणात कांदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आमटी, भाजी किंवा कोशिंबीर अशा अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण कांदा वापरतो. पण, आपण विकत आणलेल्या कांद्यावर जर काळी बुरशी लागलेली असेल, तर तो तसाच वापरावा का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

सध्या सोशल मीडियावर या काळ्या बुरशीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. विशेषतः, बुरशी लागलेला कांदा खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

बुरशी लागलेला कांदा खाल्ल्याने खरंच काही त्रास होतो का? तो कधी वापरावा आणि कधी थेट फेकून द्यावा?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कांद्यावर दिसणारी काळी बुरशी नक्की काय असते?
Image Credit : pinterest

कांद्यावर दिसणारी काळी बुरशी नक्की काय असते?

कांद्याच्या बाहेरच्या सालावर किंवा पापुद्र्यांमध्ये जी काळी पावडर किंवा काळे डाग दिसतात, ती खरंतर 'अॅस्परगिलस नायजर' (Aspergillus niger) नावाची एक प्रकारची काळी बुरशी (Black Mold) असते.

Related Articles

Related image1
Home Remedies : आजीबाईचा बटवा खरंच काम करतो का? कोणते घरगुती उपाय, काय टाळायला हवं?
35
ही बुरशी कशी तयार होते?
Image Credit : pinterest

ही बुरशी कशी तयार होते?

'अॅस्परगिलस नायजर' ही बुरशी निसर्गात मातीमध्ये आणि कुजणाऱ्या वनस्पतींमध्ये आढळते. कांद्याची काढणी केल्यानंतर किंवा साठवणूक करताना जर हवा खेळती नसेल, दमट वातावरण असेल आणि तापमान जास्त असेल, तर ही बुरशी वेगाने वाढू लागते.

तामिळनाडू कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, २८ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान आणि जास्त आर्द्रता असलेले वातावरण या काळ्या बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते.

याशिवाय, कांद्याच्या सालाला काही इजा झाली, कापला गेला किंवा ओरखडा आला, तर त्यातूनही बुरशी आत शिरू शकते. कोल्ड स्टोरेज किंवा गोदामांमध्ये कांदा साठवताना तो योग्य पद्धतीने वाळवला (Curing) नाही, तर हा धोका जास्त असतो.

45
हे आरोग्यासाठी चांगले की वाईट?
Image Credit : pinterest

हे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

कांद्यावर काळी बुरशी दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. अमेरिकेच्या USDA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कांद्याच्या फक्त बाहेरच्या सुक्या पापुद्र्यांवर काळी बुरशी असेल, तर तो भाग पूर्णपणे काढून टाकून उरलेला चांगला कांदा तुम्ही वापरू शकता.

पण, जर बुरशी कांद्याच्या आतपर्यंत गेली असेल, कांदा मऊ पडला असेल किंवा त्यातून पाणी गळत असेल, तर तो अजिबात न वापरता थेट फेकून देणे सर्वात सुरक्षित आहे.

'कांदा इतका महाग आणलाय, मग फेकून कसा द्यायचा?' असा विचार करू नका. खराब अन्न खाऊन दवाखान्यात जाण्यापेक्षा असा संशयास्पद कांदा न खाणेच उत्तम.

ज्यांना ॲलर्जी किंवा दम्याचा (Asthma) त्रास आहे, त्यांनी या बुरशीचे कण श्वासामार्गे आत घेतल्यास शिंका येणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, त्यांना दुर्मिळ प्रकरणांमध्ये Aspergillosis सारखे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

हा 'ब्लॅक फंगस' आजार आहे का?

कांद्यावर दिसणाऱ्या या काळ्या बुरशीचा, जीवघेण्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच 'ब्लॅक फंगस'शी कोणताही संबंध नाही. CDC आणि WHO च्या माहितीनुसार, म्युकरमायकोसिस पसरवणारी बुरशी साधारणपणे माती, धूळ आणि कुजलेल्या वनस्पतींमध्ये आढळते. त्यामुळे कांद्यावरची काळी बुरशी बघून तो म्युकरमायकोसिस आजार आहे, असा गैरसमज करून घेऊ नका.

55
असा कांदा कसा वापरावा आणि कसा साठवावा?
Image Credit : pinterest

असा कांदा कसा वापरावा आणि कसा साठवावा?

  • बुरशी लागलेला बाहेरचा पापुद्रा पूर्णपणे काढून टाका आणि कांदा स्वच्छ पाण्याने चांगला चोळून धुवा. यामुळे बुरशीचे कण निघून जाण्यास मदत होते.
  • जर बुरशी आतल्या भागात थोडीच असेल, तर तेवढा भाग कापून फेकून द्या आणि उरलेला चांगला कांदा स्वयंपाकासाठी वापरा.
  • पण जर कांदा मऊ पडला असेल, ओलसर झाला असेल आणि त्याला कुबट वास येत असेल, तर तो अजिबात वापरू नका. कारण बुरशीसोबतच तिथे इतर बॅक्टेरियांची वाढ झालेली असू शकते.

FSSAI च्या अन्न सुरक्षा मानकांनुसारही, अन्नामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव नसावा याची काळजी घेणे गरजेचे आहे.

बुरशी टाळण्यासाठी कांदा कसा साठवावा?

कांदा नेहमी कोरड्या, थंड आणि हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवा. हवा बंद प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कांदा ठेवू नका. त्याऐवजी जाळीदार पिशव्या (Mesh bags) किंवा टोपल्यांमध्ये कांदा ठेवा. यामुळे ओलावा साचून राहणार नाही आणि कांदा सडण्यापासून किंवा त्याला बुरशी लागण्यापासून बचाव होईल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bangles Set : सिल्क साडीवर मॅचिंग बांगड्यांचे सेट, नजर हटणार नाही
Recommended image2
Ants In House : घरात अचानक मुंग्या का वाढतात? जाणून घ्या कारणे
Recommended image3
Durga Puja 2026: पश्चिम बंगालमध्ये विसर्जनाचे नियम बदलले, क्रेनऐवजी आता ट्रॉलीचा वापर
Recommended image4
Energy Boost Tips : दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायचीय? या 6 सवयी नक्की फॉलो करा
Related Stories
Recommended image1
Home Remedies : आजीबाईचा बटवा खरंच काम करतो का? कोणते घरगुती उपाय, काय टाळायला हवं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved