January 2024 Festival List : जानेवारी 2024मध्ये साजरे केले जाणार हे सण, जाणून घ्या विवाहासाठीच्या शुभ तारखा

| Published : Dec 28 2023, 05:24 PM IST / Updated: Dec 28 2023, 05:39 PM IST

January 2024 Festivals

सार

जानेवारी महिन्यात काही सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. यामध्ये मकर संक्रातीचा सण खास असणार आहे. जाणून घेऊया जानेवारी (2024) महिन्यात कोणते सण साजरे केले जाणार याबद्दल अधिक....

January 2024 Festivals : हिंदू धर्मात सणांचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणांमागे एखादे धार्मिक, वैज्ञानिक महत्त्व आहे. वर्ष 2024 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात काही सण-उपवास असणार आहेत. यापैकी मकर संक्रांतीचा सण अत्यंत खास असणार आहे. जाणून घेऊया जानेवारी महिन्यात येणाऱ्या सणांबद्दल सविस्तर....

जानेवारी 2024 महिन्यातील सण-उपवास

  • 4 जानेवारी : कालाष्टमी
  • 7 जानेवारी : सफला एकादशी
  • 9 जानेवारी : भौमप्रदोष
  • 14 जानेवारी : भोगी, विनायक चतुर्थी
  • 15 जानेवारी : मकर संक्राती
  • 16 जानेवारी : संक्रात करिदिन
  • 21 जानेवारी : पुत्रदा एकादशी
  • 29 जानेवारी : संकष्टी चतुर्थी

शुभ तारीख

  • विवाहासाठी शुभ तारखा : 16, 17, 20, 21, 2227, 28, 29, 30, 31
  • मुंडण करण्यासाठी शुभ तारखा : 17, 31
  • गृहप्रवेशासाठी शुभ तारखा : 17, 22, 24
  • नव्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी शुभ तारखा : 4, 8, 17, 35, 26, 31

मकर संक्रांतीच्या सणाचे महत्त्व
ज्योतिष शास्रानुसार, जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ‘संक्रात’ म्हटले जाते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण साजरा केला जातो.

मकर संक्रातीच्या सणापासून सूर्य उत्तर गोलार्धातच्या दिशेने गती करतो म्हणून याला ‘उत्तरायण’ही म्हटले जाते. धर्म ग्रथांनुसार, या दिवशी देवदेवतांचा दिवस सुरू होतो. यामुळेच मकर संक्रातीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.

खरमास कधी संपणार?
जेव्हा सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. खरमास हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल त्यावेळी खरमास समाप्त होणार आहे. खरमासादरम्यान शुभ कार्य करणे वर्ज्य असते. 15 जानेवारीनंतर विवाह, मुंडण आणि गृहप्रवेशासारखी शुभ कार्य करू शकता. सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जाते.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Money Horoscope 2024 : वर्ष 2024मध्ये मकर, कुंभ व मीन राशीपैकी कोणाला होईल धनलाभ? जाणून घ्या

Money Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांना कोणत्या क्षेत्रात मिळेल यश, नोकरी की व्यवसाय?

पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी सांगितलेय गुपित