International Yoga Day 2024 : पॉवर ते एरियल योगा, जाणून घ्या योगाभ्यासाच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सविस्तर

| Published : Jun 19 2024, 03:32 PM IST / Updated: Jun 19 2024, 03:37 PM IST

Yoga During Pregnancy's
International Yoga Day 2024 : पॉवर ते एरियल योगा, जाणून घ्या योगाभ्यासाच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सविस्तर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

International Yoga Day 2024 : बहुतांशजणांना असे वाटते की, योगाचा एकच प्रकार आहे. अशातच जाणून घ्या योगाभ्यासाचे किती प्रकार असतात आणि फायदे काय याबद्दल सविस्तर...

International Yoga Day 2024 : प्रत्येक वर्षी 21 जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी योगा दिवसाची थीम 'महिला सशक्तिकरणसाठी योग' अशी आहे. योगाचा आपल्या आरोग्यासाठी फार मोठा फायदा होतो. पण बहुतांशजणांना योगाच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल माहिती नसते. खरंतर, वेगवेगळ्या बॉडी टाइपनुसार योगा करण्याची गरज असते. अशातच पॉवर योगा ते एरियल योगापर्यंतच्या वेगवेगळ्या योगाच्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

हठयोग
हठयोगमध्ये सामान्य आणि सोप्या योगासनांवर अधिक भर दिला जातो. या योगामुळे शरिर, मन आणि आत्मा शांत राहते असे मानले जाते. याशिवाय हठयोगामुळे शरिराची लवचीकता वाढण्यासह तुम्हाला रिलॅक्स वाटते.

विन्यास योगा
विन्यास योगाला प्रवाह योगाच्या रुपातही ओखळले जाते. अशा प्रकारच्या योगामुळे हृदयाचे आरोग्य, शरिराची लवचिकता, मसल्स पॉवर आणि तणाव कमी होतो.

अष्टांग योगा
अष्टांग योगामध्ये प्रत्येक आसन श्वसनासोबत करावे लागते. यामध्ये काही सोप्या आसनांचाही समावेश असतो. यामुळे शरिराला बळकटी मिळते. अष्टांग योगामुळे तणाव, शरिर लवकचीकता वाढण्यासह वजन कमी देखील होते.

यिन योगा
यिन योगमध्ये स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंगवर अधिक लक्ष दिले जाते. यामध्ये शरिराच्या लवचीकता वाढवण्याचे काम करते. यामधील एक आसन कमीतकमी तीन ते पाच मिनिटांपर्यंत केले जाऊ शकते. यिन योगामुळे स्नानूंचे दुखणे कमी होऊ शकते.

पॉवर योगा
पॉवर योगा सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहे. याच्या माध्यमातून वेगाने वजन कमी होऊ शकते. पॉवर योगामध्ये हाय इंटेंसिटी योगा आसनांसोबत स्ट्रेंथवर लक्ष दिले जाते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पॉवर योगा करू शकता.

शिवानंद योगा
शिवानंद योगाच्या माध्यमातून तुमच्या एकूणच संपूर्ण शरिरावर लक्ष दिले जाते. यामध्ये बॅलेन्स डाएट आणि सकारात्मक विचारावर लक्ष देण्यासह हेल्थ, व्यायाम आणि विश्रामावर लक्ष केंद्रित केले जाते.

एरियल योगा
एरियल योगामध्ये एका मोठ्या सूती कापडाचा वापर केला जातो. एखाद्या झोपाळ्याप्रकारे सूती कापड बांधला जातो. या योगाभ्यासातील काही आसनांमुळे शरिराची लवचीकता अधिक वाढली जाते.

आणखी वाचा : 

जिमला करा गुडबाय, घरच्याघरी वजन कमी करण्यासाठी करा 3 योगासने

हेल्दी आरोग्य आणि बाळासाठी प्रेग्नेंसीमध्ये करता येतील ही 5 सोपी योगासने

Read more Articles on