फर्टिलिटी वेगाने वाढवण्यासाठी दररोज करा ही 6 सोपी योगासने
- FB
- TW
- Linkdin
बटरफ्लाय पोज
बटरफ्लाय पोजला बद्धकोणासन असे देखील म्हटले जाते. हे नितंबाकडील हाडांसाठी फायदेशीर ठरत फर्टिलिटी वाढवते. यासाठी गुडगे दुमडून तळव्यांवर हात ठेवा. आता हळूहळू दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने दाबवण्याचा प्रयत्न करता. दीर्घ श्वास घेत 1-2 मिनिटांपर्यंत थांबा.
ब्रिज पोज
सेतू बंधासन अथवा ब्रिज पोज केल्याने नितंबाच्या येथील हाडांना बळकटी मिळते. याशिवाय प्रजनन क्षमता वाढते आणि हार्मोन्सचा स्तर नियंत्रित राहते. ब्रिज पोज करण्यासाठी आपले गुडघे 90 डिग्री मध्ये घेऊन येत पाठ वरच्या दिशेने उचला. यावेळी हात जमिनीवरच राहू द्या. या स्थितीत 30 सेकंद ते 1 मिनिटांपर्यंत राहू शकता.
बालासन
बालासन म्हणजेच चाइल्ड पोजमुळे तणाव कमी होते. पाठीच्या खालील भागमध्ये बालासन वेळी दबाव पडला जातो आणि प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. बालासन करण्यासाठी एखाद्या लहान मुलासारखे बसावे.
विपरीत करणी आसन
विपरीत करणी आसनमध्ये पोटाच्या येथील भागात रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी भींतीला पाय लावून पाठीवर झोपावे लागते. यानंतर पाय 90 डिग्रीवर उचलून कोनाच्या स्थितीत रहा. आता दीर्घ श्वास घेत 5 मिनिटे थांबा आणि सामान्य स्थितीत या.
मार्जरी आसन
मार्जरी आसनमुळे पाठीच्या मणक्याला फायदा होतो. तणाव कमी करण्यासह प्रजनन अवयवय अॅक्टिव्ह करण्यासाठीही मार्जरी आसनचा फायदा होतो. हे आसन करण्यासाठी टेबल टॉप पोजीशनमध्ये आपले हात आणि गुडघ्यांपासून सुरुवात करा. श्वास घ्या आणि पाठ वरती उचला. आता हळूहळू श्वास सोडत मार्जरी आसनच्या स्थितीत 1-2 मिनिटांपर्यंत थांबा.
कोबरा पोज
कोबरा पोज म्हणजेच भुजंगासन केल्याने पोटाच्या येथील भागात रक्त पुरवठा उत्तम होते. हे आसन करण्यासाठी छातीच्या येथील भाग वरच्या दिशेने उचला. यावेळी हात जमिनीवरच राहू द्या. हे आसन दररोज 2-3 मिनिटांपर्यंत करू शकता.
आणखी वाचा :
मधुमेहाच्या रुग्णांसाठी 3 उपयुक्त योगा टिप्स, रक्तातील साखरही राहिल नियंत्रणात
हृदयविकाराच्या झटक्यावर मात देतील या 3 योगा टिप्स, जाणून घ्या सविस्तर