हृदयविकाराच्या झटक्यावर मात देतील या 3 योगा टिप्स, जाणून घ्या सविस्तर

| Published : Jun 20 2024, 01:03 PM IST / Updated: Jun 20 2024, 01:04 PM IST

Yoga Day 2024 Yoga Tips for Heart Attack

सार

Yoga Day 2024 : हृदयासंबंधित आजारांमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होत चालली आहे. अशातच पुढील काही सोप्या योगा टिप्स वापरुन तुम्ही हृदयाचे आरोग्य राखू शकता.

 

Yoga Day 2024 : सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यावर फार मोठा परिणाम होतोच. याशिवाय काही आजारही मागे लागतात. अशातच संपूर्ण आरोग्यासह हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. पण गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये हृदय विकाराच्या झटक्यांची प्रकरणे अधिक वाढली जात असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यापासून दूर राहण्यासाठी पुढील काही खास टिप्स जाणून घेऊया सविस्तर...

क्लॅपिंग थेरेपी
क्लॅपिंग थेरेपी ही नैराश्यातून स्थितीतून बाहेर येण्यासाठी फायदेशीर ठरते. हृदय आणि फुफ्फुसासंदर्भातील समस्या, अस्थमाच्या उपचारासाठी क्लेपिंग थेरपी फार महत्तवाची भूमिका साकारते. या तंत्रज्ञानाचा आधार घेणारे म्हणतात की, शरिरावर दबाव पडल्याने तुमच्या उर्जेत संतुलन निर्माण होऊ शकते. याशिवाय दुखण्यापासून आराम मिळतो. टाळ्या वाजवल्याने केवळ शरिराला फायदा होतोच. याशिवाय मानसिक आरोग्यही सुधारले जाते. कारण क्लॅपिंग थेरपीमुळे ब्लड सर्कुलेशनही सुधारले जाते.

टॅपिंग थेरपी
टॅपिंग थेरपीला प्रोग्रेसिव्ह मस्कुलर थेरेपी असेही म्हटले जाते. याचा संपूर्ण शरिराला फायदा होता. अँक्यूप्रेशरसारखी असणारी टॅपिंग थेरपी शरिरातील काही पॉइंटवर दाबणे किंवा टॅप केले जाते. असे केल्याने शरिरातील पॉइंट्सवर ब्लड सर्कुलेशन वाढू लागतात. ब्लड फ्लो वाढल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.

अनुलोम-विलोम प्राणायाम
अनुलोम-विलोम प्राणायाममुळे शरिराला ऑक्सिजनची पुर्तता करण्यासह रक्त शुद्ध होण्यास मदत करते. याशिवाय उच्च रक्तदाबाची स्थिती नियंत्रणात राहते. अशातच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. एवढेच नव्हे हार्ट-ब्लॉकेज उघडण्यासाठीही अनुलोम-विलोम योगासन फायदेशीर आहे. याच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रित केला जाऊ शकतो. दररोज सकाळी 10 मिनिटे अनुलोम-विलोम प्राणामय केल्याने हृदयाचे आरोग्य नक्कीच सुधारले जाईल.

YouTube video player

आणखी वाचा : 

International Yoga Day 2024 : पॉवर ते एरियल योगा, जाणून घ्या योगाभ्यासाच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सविस्तर

Yoga Day 2024 : फुफ्फुसे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज सकाळी करा ही 4 योगासने, रहाल आजारांपासून दूर

Read more Articles on