सार
Yoga for diabetes : योगाच्या माध्यमातून रक्तातील साखर आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. अशातच जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांसाठी तीन उपयुक्त अशा योगा टिप्स कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर...
Yoga for diabetes : गेल्या अलीकडल्या काळात देशभरात मधुमेहाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. भरतात 100 दशलक्षहून अधिक नागरिक मधुमेह आजाराचा सामना करत आहेत. ही आकडेवारी गेल्या चार वर्षांमध्ये 44 टक्क्यांनी वाढली आहे. अशातच मधुमेहसह रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. पण तुम्हाला माहितेय का योगाच्या माध्यमातूनही मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया....
मल्टीग्रेन पीठाचे सेवन
मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे फार लक्ष द्यावे लागते. अशातच तुम्ही मल्टीग्रेन पीठाचे सेवन करु शकता. यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असते. यामुळे रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय मधुमेहासंदर्भातील समस्या जसे की, उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि इंसुलिनचा शरिरातील स्तर वाढण्यास मल्टीग्रेन पीठ मदत करते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, जेवल्यानंतर 10-15 मिनिटे शतपावली जरुर करावी.
जेवल्यानंतर वज्रासन स्थितीत बसा
आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच लघवी करावी असे म्हटले आहे. यामुळे किडनीचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यासंबंधित आजार दूर होतात. ही सवय हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे मानले जाते. जेवल्यानंतर वज्रासन स्थितीत बसावे असा सल्ला दिला जातो. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते.
दररोज करा मंडूकासन
मंडूकासन म्हणजे बेडकासारखे आसन करणे. यामध्ये छाती, खांदे, पोट, कंबर अशा स्नायूंच्या जोरावर केले जाते. मंडूकासन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. याशिवाय पोटातील स्नायू टोण्ड होण्यासह पोटावरील चरबी कमी होण्यास फायदा होतो.
आणखी वाचा :
हृदयविकाराच्या झटक्यावर मात देतील या 3 योगा टिप्स, जाणून घ्या सविस्तर