सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे प्रदीर्घ आजारामुळे मंगळवारी (14 नोव्हेंबर 2023) निधन झाले.
सुब्रत रॉय यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यावेळेस पत्नी स्वप्ना व मुलगा सुशांतो त्यांच्यासोबत नव्हते. ते मॅसेडोनियामध्ये राहत आहेत.
दुचाकीवरून खाद्यपदार्थ विकून अब्जावधी किंमतीचे साम्राज्य निर्माण करणारे सुब्रत रॉय राजेशाही पद्धतीने जीवन जगत होते.
सुब्रत रॉय यांच्या वादग्रस्त व्यावसायिक जीवनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण ते एक आदर्श पती होते, हे खूप कमी लोकांना माहितीये. स्वप्ना यांच्यासोबत त्यांचे नाते खूप मजबूत होते.
बिहारच्या अररिया शहरात जन्मलेले सुब्रत गोरखपूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. यावेळेस त्यांचे कॉलेजमधील हुशार विद्यार्थिनीसोबत प्रेम जुळले.
सुब्रत रॉय यांची स्वप्नासोबत कोलकाता शहरात भेट झाली होती. पहिल्याच भेटीत सुब्रत यांना स्वप्ना आवडल्या होत्या.
स्वप्ना यांच्या सौंदर्य व साधेपणाने सुब्रत यांना आपलेसे केले होते. त्यांनी लवकरच आपल्या मनातील भावनाही स्वप्नासमोर कबुल केल्या. यावर स्वप्ना यांनीही लगेचच होकार दिला.
स्वप्ना यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की सुब्रत खूप रोमँटिक होते. यामुळे स्वप्नाही त्यांच्या प्रेमात पडल्या. वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने वर्षातून केवळ दोनदाच भेट होत असे.
यादरम्यान सुब्रत यांनी स्वप्ना यांनी बरीच प्रेमपत्र लिहिली. तब्बल सात वर्ष पत्रव्यवहार सुरू होता. यानंतर दोघांनीही लग्न केले.
लग्नानंतर सुब्रत व्यवसायासाठी संघर्ष करत होते. यावेळेस स्वप्ना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी स्वप्ना यांनी सुब्रत यांना खूप मदतही केली.