सार
मेहरून्निसा शौकत अलीने भारताच्या इतिहासात आज आपले नाव कोरले आहे. खरंतर मेहरून्निसा भारतातील पहिली महिला बाउंसर आहे. तिचा आयुष्यातील महिला बाउंसर पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
India First Women Bouncer : मेहरून्निसा शौकत अली (Mehrunnisa Shaukat Ali), भारतातील पहिली महिला बाउंसरच्या रुपात आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. मेहरून्निसा उत्तर प्रदेशातील सहारनपुर, उत्तराखंड सीमेलगतच्या एका शहरात राहते. मेहरून्निसाचा भारतातील पहिली महिला बाउंसरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. खरंतर, मेहरून्निसाने आयुष्यात अनेक संघर्षावर मात करण्यासह समाजाच्या चौकटीतून बाहेर पडत आपल्या कामावर प्रेम केले.
सैन्यात किंवा पोलीस अधिकारी व्हायचे होते
मेहरून्निसाला आयुष्यात सैन्यात किंवा पोलीस अधिकारी व्हायचे होते. पण परस्थितीपुढे काहीही होऊ शकत नाही. मेहरून्निसाला आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण आपल्या स्वप्नाला तिने एक नवी दिशा दिली. मेहरून्निसा दिल्लीतील हौज खास व्हिलेज येथे महिला बाउंसरच्या रुपात काम करते. तिच्या आयुष्याची कथा संघर्षात्मक आहे.
घरापासून सुरू झाला होता संघर्ष
मेहरून्निसाचा आयुष्यातील संघर्ष घरापासूनच सुरू झाला होता. मेहरून्निसाला आयुष्यात शिकायचे होते. मेहरून्निसाने शिक्षण घेऊ नये म्हणून लहानपणी तिचे वडील घरातील वीज कापायचे. खरंतर वडील असा विचार करायचे की, आपल्या मुली शिकल्या तर आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यास हट्ट करतील अथवा घरातून पळून जातील.
याउलट मेहरून्निसाच्या आईची विचारसरणी फार वेगळी होती. तिच्या आईला आपल्या मुलींनी शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे असे तिला वाटायचे. यासाठी मेहरून्निसाच्या आईने पतीसह समाजाशी लढली. यामुळेच मेहरून्निसा आणि तिच्या बहिणीला शाळेत जाण्याची संधी मिळाली. (Bhartatil pahili mahila bouncer)
देशातील पहिलीच महिला बाउंसर
उत्तर प्रदेशातील सहारनगुपमध्ये राहणारी मेहरून्निसा भारतातील पहिलीत महिला बाउंसर आहे. खरंतर, बाउंसर असे एक प्रोफेशन आहे ज्यामध्ये बहुतांशकरून पुरुष मंडळीच दिसतात. कधीही कोणाच्या समोर न झुकणारी मेहरून्निसा दिल्लीतील हौज खास व्हिलेजच्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. ड्युटीवेळी होणारे वाद, भांडण, बेकायदेशीर ड्रग्ज पकडून देणे आणि महिलांची सुरक्षिततेची मेहरून्निसा खास काळजी घेते. याशिवाय मेहरून्निसाची आज एक खासगी सिक्युरिटी कंपनीही आहे.
इंडियन आयडलमुळे बदलले आयुष्य
बाउंसरच्या रुपात काम करणे मेहरून्निससाठी सोपे नव्हते. कामाच्या ठिकाणी अनेकवेळा काही आव्हानांनाही तोंड द्यावे लागले. पुरुषांच्या तुलनेत महिला बाउंसरला ना सन्मान ना कामही मिळत होते. पण वर्ष 2004 नंतर इंडियन आयडलच्या टीमच्या सुरक्षिततेची जबाबदारी मेहरून्निसाने सांभाळली. यानंतर तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास सुरूवात झाली. मेहरून्निसाने अमिताभ बच्चन ते रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी आणि दीपिका पादुकोणसारख्या दिग्गज कलारारांना सिक्युरिटी दिली आहे.
आणखी वाचा :
अनंत अंबानीची साली कोण आहे? जिची आलीया भटही आहे कस्टमर
नीता अंबानींची गुलाबी साडी आहे खास, चक्क हातमागावर एवढे दिवस विणलीय