गादीला येणारा दुर्गंध मिनिटांत होईल दूर, घरीच असा तयार करा स्प्रे

| Published : Nov 22 2024, 12:00 PM IST

Foul smell to bed

सार

गादीला येणारा दुर्गंध तुमची झोप उडवू शकते. घरी आलेल्या पाहुण्यांसमोरही यामुळे लाजिरवाण्यासारखे वाटते. अशातच गादीला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी घरच्याघरी स्प्रे तयार करू शकता. 

Tricks to remove odors from bed and cushion : घराची स्वच्छता एकट्याने करणे फार कठीण जाते. घरातील बहुतांश सामानाची दररोज स्वच्छता होत नाही. त्यापैकीच एक म्हणजे गादीची स्वच्छता. गादीची स्वच्छता करणे एक मोठा टास्कच आहे. गादीवर दररोज धूळ-माती, घामाचा वास यामुळे त्यामधून कालांतराने दुर्गंध येण्यास सुरुवात होते. काही घरांमध्ये बेडवर बसूनच जेवले जाते. अशातच गादीला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.

टी ट्री ऑइल आणि लिंबाचा स्प्रे
गादीला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी टी ट्री ऑइल आणि लिंबाचा स्प्रे तयार करू शकता. याच्या मदतीने गादीमधील बॅक्टेरिया दूर होतील. टी ट्री ऑइल आणि लिंबाचा स्प्रे तयार करण्यासाठी आधी पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. यामध्ये काही थेंब टी ट्री ऑइल आणि लिंबाच्या रसाचे मिक्स करा. स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर गादीवर शिंपडा आणि उन्हामध्ये गादी सुकण्यास ठेवा. यामुळे गादीला येणारा दुर्गंध दूर होईल.

कोरफड आणि मिंट ऑइल स्प्रे
गादीचा सातत्याने वापर केल्यानंतर अस्वच्छ आणि यामधून दुर्गंध येण्यास सुरूवात होते. यामुळे गादीला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी कोरडफीचा गर, पाणी आणि मिंट ऑइलचा वापर करावा लागेल. सर्व सामग्री एकत्रित मिक्स करुन स्प्रे तयार करा. दुर्गंध येणाऱ्या गादीवर स्प्रे करुन ती उन्हामध्ये थोडावेळ ठेवा.

व्हिनेगर आणि बेकिंग पावडर स्प्रे
गादीचा दुर्गंध दूर होण्यासाठी अतिशय उपयुक्त स्प्रे घरीच तयार करू शकता. यासाठी व्हिनेगर, बेकिंग पावडर आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम पाण्यामध्ये बेकिंग पावडर मिक्स करा. यामध्ये तीन ते चार चमचे लिंबाचा रस आणि व्हिनेगरचे दोन चमचे घालून स्प्रे तयार करा. तयार केलेला स्प्रे दुर्गंध येत असलेल्या गादीवर शिंपडा.

आणखी वाचा : 

सुक्या किंवा रस्सा भाजीत मीठ जास्त पडलेय? वापरा या ट्रिक्स

मानसिक आरोग्यासाठी घातक ठरतात या 5 सवयी, आजच दूर रहा