बाथरुमच्या टाइल्सवरील टिकलीचे डाग होतील दूर, वापरा ही 10 रुपयांची पावडर

| Published : Jan 01 2025, 01:05 PM IST

Bindi
बाथरुमच्या टाइल्सवरील टिकलीचे डाग होतील दूर, वापरा ही 10 रुपयांची पावडर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बहुतांश महिलांना बाथरुममधील टाइल्स ते आरशावर टिकली लावल्यानंतर त्याला चिकटवण्याची सवय असते. अशातच टिकलीचे डाग राहतात. हेच डाग दूर करण्यासाठी सोपी ट्रिक वापरू शकता.

Tips to remove bindi glue : कपाळाला लावलेली टिकली महिलेचे सौंदर्य वाढवते. पण टिकली लावल्यानंतर बहुतांश महिला ती बाथरुममधील टाइल्स किंवा आरशावर चिकवटतात. यामुळे टिकलीचे डाग भितींवर किंवा आरशावर राहिले जातात. अशातच टिकलीचे डाग दूर करण्यासाठी बहुतांशजण साबण, क्लिनिंग प्रोडक्ट्स किंवा डिटर्जेंटचा वापर केला जातो. तरीही डाग दूर होत नसल्यास पुढील काही ट्रिक वापरू शकता.

टिकलीचे डाग असे करा दूर

बाथरुमचे स्वच्छता आपण वेळोवेळी करतो. पण बाथरुमच्या टाइल्सवरील टिकलीचे डाग दूर करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यासाठी महागड्या क्लिनिंग प्रोडक्ट्स घेऊनही काही होत नसल्यास 10 रुपयांच्या बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.

बेकिंग सोड्याचा असा करा वापर

  • बाथरुममधील टाइल्सवरील टिकलीचे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यामुळे टाइल्सवरील डाग दूर होतील. पण याचा वापर कसा करायचा याबद्दल पुढे जाणून घेऊया...
  • टिकलीचे डाग दूर करण्यासाठी सर्वप्रथम बाथरुमच्या टाइल्सवर पाणी शिंपडा.
  • टाइल्सवर बेकिंग सोडा आणि मीठाचे मिश्रण स्प्रे करुन 5-10 मिनिटे ठेवा.
  • सॉफ्ट ब्रशने टाइल्सवरील डाग स्वच्छ करा.
  • पाण्याच्या मदतीने टाइल्स धुवा.
  • कापडाच्या मदतीने टाइल्स धुतल्यानंतर डाग गेलेत की नाही हे पाहा.
  • डाग अधिकच गडद असल्यास पुन्हा बेकिंग सोड्याचे मिश्रण वापरा. अशाप्रकारे कोणत्याही केमिकलचा वापर न करता टाइल्सवरील टिकलीचे डाग दूर होतील.

आणखी वाचा : 

हेल्दी आणि टेस्टी Eggless Mayonnaise रेसिपी, 5 मिनिटांत होईल तयार

कपाट ते बाथरुममध्ये शिरलेला उंदीर जाईल पळून, करा हा खास उपाय