मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या मेयोनिजमध्ये हाय कॅलरीज व प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पण घरच्याघरी 5 मिनिटांत व्हेज मेयोनिज तयार करू शकता.
अर्धा कप फूल फॅट दूख, 10 काजू, 100 ग्रॅम पनीर, 10 ग्रॅम बटर, व्हिनेगर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ.
मिक्सर ज्युसरच्या भांड्यात अर्धा कप थंड दूध घालून मिक्सरला लावा.
दूधात बटर, काजू आणि पनीर घालून पुन्हा मिश्रण वाटून घ्या. यावेळी घट्ट मिश्रण तयार करा.
घट्ट मिश्रणात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला. यामुळे मयोनिजला आंबट तुरट चव येईल. यानंतर मीठ आणि साखर घालून मिश्रण व्यवस्थितीत ढवळून घ्या.
मिक्सरमधून मिश्रण बाहेर काढा. मिश्रण मऊसर झाल्यास ते मिक्सरच्या भांड्यातून काढत सँडविच किंवा पोळीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.