Marathi

How To Store Eggs?

महिनाभर अंडी टिकवून ठेवायची आहेत? मग जाणून घ्या सोप्या टिप्स

Marathi

हिवाळ्यातील पोषक खाद्यपदार्थ

प्रोटीनचे उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. हिवाळ्यामध्ये अंड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ होते. कारण यातील पोषणतत्त्वामुळे शरीराला उष्णता मिळते. हिवाळ्यात शरीराला ऊब मिळणं आवश्यक असते. 

Image credits: Getty
Marathi

हिवाळ्यात अंड्याची किंमत का वाढते?

हिवाळा ऋतू येताच अंड्यांच्या किंमतीत वाढ होते. यामुळे खिशावर ताण येऊ नये, यासाठी काही लोक एकाच वेळेस अंड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. 

Image credits: freepik
Marathi

अंडी होऊ शकतात खराब

पण अंडी व्यवस्थित स्टोअर न केल्यास ती खराब होण्याची शक्यता अधिक आहे.

Image credits: pexels
Marathi

अंडे कसे स्टोअर करायचे?

अंडी खराब होऊ नयेत, यासाठी जाणून घेऊया स्टोअर करण्याच्या सोप्या पद्धती

Image credits: freepik
Marathi

फ्रीजमध्ये ठेवा अंडी

अंडी जास्त काळ टिकून राहावीत, यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवा. पण दरवाज्याच्या बाजूस असणाऱ्या रॅकऐवजी फ्रीजच्या मधोमध अंड्याचे रॅक ठेवावे. कारण येथे तापमान एकसारखेच असते.

Image credits: Getty
Marathi

मातीचे मडके

मातीच्या मडक्यातही अंडी स्टोअर करू शकता. मडक्याच्या आतमध्ये गवत ठेवा आणि त्यावर अंडी व्यवस्थित ठेवावीत.

Image credits: social media
Marathi

ज्युटची पिशवी

जर आपण मोठ्या प्रमाणात अंड्यांची खरेदी करत असाल तर ती ज्युटीच्या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवा. याद्वारेही अंडी दीर्घकाळासाठी फ्रेश राहण्यास मदत मिळू शकते.

Image credits: social media
Marathi

मिनरल ऑइल

अंडी दीर्घकाळासाठी फ्रेश राहावीत, यासाठी त्यावर मिनरल ऑइल लावावे आणि यानंतर अंडी उन्हात ठेवावीत. पाच मिनिटांनंतर एका डब्यात अंडी भरून किचनमध्ये ठेवून द्यावीत.

Image credits: Getty
Marathi

खराब झालेले अंडे कसे ओळखावे?

अंडे चांगले आहे की खराब? हे ओळखण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. पाण्यात अंडे सोडावे. पाण्यात अंडे बुडाले तर ते फ्रेश आहे. अंडे तरंगू लागल्यास ते अंडे खाण्यायोग्य नाही, हे ओळखावे.

Image credits: freepik
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pexels

सई ताम्हणकरचे हॉट फोटोशूट, एकापेक्षा एक सुंदर आहेत डिझाइनर ड्रेस

लाल तांदळाचा डाएटमध्ये करा समावेश, मिळतील जबरदस्त फायदे

Diwali 2023 : कांजीवरम साडीवर येथे मिळतोय 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

हातावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 10 व्यायाम