सार

अनेकांना बऱ्याचदा दिवसभर थकल्यासारखा किंवा आळस येतो यामुळे काम करण्याची इच्छा होत नाही आणि चिडचीड होते. यासाठी आम्ही तुम्हाला 2 योगासनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल दिवसभर टिकून राहील. चला तर मग जाणून घेऊया.

अनेकदा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अशक्तपणा जाणवतो. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही. तसेच काम न झाल्यामुळे चिडचिड देखील वाढते आणि अनाहुनतपणे त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.दिवसभराचा हा थकवा घालवायचा असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करायला हवा. यासाठी तुम्हाला 2 योगासन बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची उर्जा पातळी दिवसभर स्थिर राहील. चला तर मग जाणून घेऊया.

भुजंगासन :

हे आसन पोटाच्या स्नायूंना टोनिंग करण्यास देखील मदत करते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, पाठ आणि खांदे मजबूत होतात आणि तुमच्या मणक्याची लवचिकता देखील यामुळे सुधारते. तणाव आणि थकवा दूर करण्यात भुजंगासन मोठी भूमिका बजावतो. एकूणच, तुमची फिटनेस ध्येये साध्य करण्यासाठी कोब्रा पोज हा एक उत्तम मार्ग असून दैनंदिन केल्यास फीट राहण्यासही तुम्हाला मदत होईल.

भुजंगासन कसे करावे :

  • सर्वप्रथम, योगा मॅटवर पोटावर झोपा.
  • आता दोन्ही तळवे जमिनीवर ठेवा.
  • तुम्हाला तळवे खांद्याची रुंदी वेगळी ठेवावी लागेल.
  • त्यानंतर शरीराचा खालचा भाग जमिनीवर ठेवा.
  • श्वास घेताना तळहातावर दाब द्या.
  • कंबरेपासून वरचे शरीर उचला
  • आता श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.

कपालभाती :

हे आसन केल्याने तुमचे स्नायू आणि एब्स मजबूत होतील. याशिवाय तुमच्या पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होईल. या योग आसनामुळे श्वसन प्रणाली देखील मजबूत होते. यामुळे तुमच्या नसा मजबूत होतात. याशिवाय रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.कपालभातीमुळे चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते.तसेच यामुळे स्मरणशक्ती देखील वाढण्यास मदत होते. तसेच तुम्ही दिवसभर उत्साही राहता.

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.