हिवाळ्यात घर उबदार ठेवण्यासाठी काय करावं, मिनी हिटरने दाखवली कमाल
हिवाळ्यात घर उबदार ठेवण्यासाठी पडदे बंद ठेवणे, जाड कार्पेट वापरणे, आणि गरम पाण्याची बादली ठेवणे यांसारखे उपाय सांगितले आहेत. यासोबतच, टेबल फॅन आणि गरम पाण्याच्या मदतीने घरगुती मिनी हीटर तयार करून खोली कशी उबदार करता येईल.

हिवाळ्यात घर उबदार ठेवण्यासाठी काय करावं, मिनी हिटरने दाखवली कमाल
हिवाळ्यात घर उबदार असणं आवश्यक असतं. आपण बाहेर जाऊन आल्यावर घरात आपल्याला गरमी जाणवायला हवी. आपण आपण अशावेळी काय करावं याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
पडदे बंद ठेवणे
सकाळचा सूर्य उगवल्यावर पडदे उघडा आणि संध्याकाळी सर्व पडदे बंद करून ठेवा. त्यामुळे बाहेरची थंडी आत येत नाही आणि घरातील वातावरण गरम आणि उबदार राहतं.
जाड कार्पेट/दरी वापरा
पायथ्याशी थंड हवेमुळे घर थंड होते. फ्लोअरवर जाड कार्पेट किंवा दरी पसरवून ठेवा. त्यामुळे घर लवकर गरम होतं आणि उब टिकते.
गरम पाण्याची बादली किंवा केटल-स्टीम
एका कपाटात किंवा खोलीत गरम पाण्याची बादली ठेवून दरवाजा बंद करा. हवेतील ओलावा वाढतो आणि खोली गरम भासते. यावेळी सुरक्षिततेची काळजी घ्या.
गरम पाण्याची बॉटल / हीटिंग पॅड
जर तुम्ही बेडरूम गरम करायची असेल तर हीटिंग पॅड किंवा हॉट वॉटर बॉटल बेडवर ठेवा. बेड झटपट गरम होईल. गरम बेडवर झोपल्यावर आपल्याला झोप लवकर येईल.
छोट्या जागेत राहा
जास्त थंडी असेल तर मोठी खोली सोडा आणि छोट्या खोलीत रहा. छोटी जागा लवकर गरम होते आणि उष्णता टिकते.
घरगुती मिनी हीटर–ट्रिक
टेबल फॅन + गरम पाण्याची बादली फॅनला स्लो मोड वर लावा. ज्यामुळे गरम वाफ खोलीभर पसरेल. यामुळे मिनी हीटरसारखी उब मिळते.

