दिवसातून किती वेळा ब्लड शुगर तपासावी?
Blood Sugar Test : मधुमेह (Diabetes) हा एक दीर्घकालीन आजार असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे अत्यंत गरजेचे असते. पण बरेच जण गोंधळात पडतात की नेमकं दिवसातून किती वेळा ब्लड शुगर तपासावी? याबद्दल सविस्तर वाचा.
15

Image Credit : Freepik
टाइप 1 डायबेटिस असलेल्या व्यक्तींसाठी
टाइप 1 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही, त्यामुळे शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित मोजणी गरजेची असते.
- दिवसातून ४ ते ६ वेळा शुगर तपासावी
- उठल्यावर उपाशीपोटी
- प्रत्येक जेवणाच्या आधी आणि २ तासांनी
- झोपण्याआधी
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Getty
टाइप 2 डायबेटिस (गोळ्यांवर किंवा इन्सुलिनवर) असलेल्या व्यक्तींसाठी
- इन्सुलिन घेत असाल तर दिवसातून २ ते ४ वेळा तपासणे योग्य
- उपाशीपोटी
- जेवणानंतर (Postprandial)
- कधी कधी झोपण्यापूर्वी
फक्त गोळ्या घेत असाल (oral medication) :
-दिवसातून 1-2 वेळा पुरेसे असते
-उपाशीपोटी किंवा जेवणानंतर
-आठवड्यातून 2-3 वेळा सुद्धा पुरेसे असते, जर शुगर नियंत्रणात असेल
35
Image Credit : our own
ज्येष्ठ नागरिक किंवा नियंत्रित मधुमेह असलेल्यांसाठी
जर शुगर नीट नियंत्रणात असेल आणि डॉक्टरांनी स्पष्ट सूचना दिल्या असतील तर आठवड्यातून 2-3 वेळा तपासणी पुरेशी असते. विशेषतः उपाशीपोटी आणि जेवणानंतर टेस्ट करू शकता.
45
Image Credit : others
गर्भधारणेदरम्यान डायबेटिस (Gestational Diabetes)
गर्भधारणेदरम्यान डायबेटिसवेळीशुगर नियंत्रण फार महत्त्वाचे असते कारण बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
- दिवसातून 4 वेळा तपासावी
- उपाशीपोटी
- प्रत्येक मुख्य जेवणानंतर
55
Image Credit : social media
कधी तत्काळ शुगर तपासावी?
- चक्कर येणे, थकवा, घाम येणे, अचानक भूक लागणे यासारख्या लक्षणांमध्ये
- शुगर जास्त किंवा कमी होण्याची शक्यता असल्यास
- नवीन औषध सुरू केल्यावर
- आजारी असताना (सर्दी, ताप, इ.)
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

