गरम पाण्याच्या बॉटला आतमधून बुरशी पकडलीय? हा उपाय करुन मिनिटांत होईल स्वच्छ

| Published : Jan 07 2025, 08:32 AM IST

Steel bottle cleaning tips
गरम पाण्याच्या बॉटला आतमधून बुरशी पकडलीय? हा उपाय करुन मिनिटांत होईल स्वच्छ
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

थंडीच्या दिवसात सातत्याने स्टीलच्या बॉटलमध्ये गरम पाणी ठेवून प्यायले जाते. यामुळे बॉटलमध्ये पांढऱ्या रंगाचा बुरशीसारखा स्तर जमा होऊ लागतो. अशातच बॉटल स्वच्छ करुन पुन्हा पाणी भरावे. जाणून घेऊया गरम पाण्याची बॉटल धुण्यासाठी सोपा उपाय...

स्टीलच्या बॉटलमध्ये सातत्याने पाणी ठेवल्यानंतर आतमध्ये पांढऱ्या रंगाची एक लेअर तयार होते. यामुळे बॉटलची स्वच्छता करणे फार गरजेचे आहे. यासाठी लिंबासह अन्य काही घरगुती वस्तूंचा वापर करुन स्टीलची बॉटल स्वच्छ करू शकता. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया...

लिंबू आणि बेकिंग सोडा

  • स्टीलच्या बॉटलमध्ये 2-3 चमचे लिंबाचा रस टाका.
  • बॉटलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिक्स करुन दोन्ही सामग्री एकत्रित केल्यानंतर फेस येईल.
  • बॉटलमध्ये गरम पाणी भरुन 10-15 मिनिटांसाठी ठेवा.
  • बॉटल क्लिनींग ब्रशच्या मदतीने आतमधून स्वच्छता करा.
  • पाण्याने बॉटल स्वच्छ धुतल्यानंतर सुकण्यास ठेवा.

हेही वाचा : आठवड्याभरात वाढेल मनी प्लांट, करा हे काम

लिंबू आणि व्हिनेगरचा वापर

  • बॉटलमध्ये व्हिनेगर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा
  • बॉटलमध्ये गरम पाणी भरुन 10 मिनिटांसाठी ठेवा
  • ब्रशने बॉटल आतमधून स्वच्छ करा
  • लिंबू आणि तांदळाचे पाणी
  • बॉटल स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस आणि तांदळाच्या पाण्याचा वापर करा.
  • बॉटलमध्ये गरम पाणी घालून 10 मिनिटांसाठी ठेवा.
  • बॉटल क्लिनिंग ब्रशच्या मदतीने आतमधून स्वच्छ करत पाण्याने धुवा.

लिंबू आणि मीठाचा वापर

  • लिंबू अर्धा कापून बॉटलमध्ये भरुन ठेवा
  • 1 चमचा मीठ घाला
  • थोड गरम पाणी घालून बॉटल हलवा.
  • ब्रशच्या मदतीने स्वच्छ करत पाण्याने धुवा.

आणखी वाचा : 

बाथरूम वर्षानुवर्षे चमकत राहील! या सोप्या टिप्स वापरा

भांडी घासण्यासाठी डिशवॉशचा करा वापर, ५ मिनिटात किचन होईल साफ