मनी प्लांटचे रोप पाण्यात किंवा मातीत लावता येते. घराची शोभा वाढण्यासह मनी प्लांट आर्थिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांटच्या वाढीसाठी काय करावे पुढे जाणून घेऊया…
मनी प्लांट वेगाने वाढण्यासाठी त्याला दररोज पाणी घाला. यावेळी रोपाला अधिक पाणी देखील घालणे टाळा. अन्यथा रोप वाढण्याएवजी मातीत कुजले जाईल.
मनी प्लांट वाढण्यासाठी त्याला पुरेसा सुर्यप्रकाश मिळणे फार महत्वाचे असते. यामुळे सुर्यप्रकाशाच्या ठिकाणी मनी प्लांट ठेवा.
मनी प्लांटच्या पानांवर धूळ, माती चिकटली जाते. यामुळे मनी प्लांट वेगाने वाढण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे आठवड्यातून एकदा रोपाच्या पानांची देखील स्वच्छता करा.
मनी प्लांट आठवड्याभरात वेगाने वाढण्यासाठी वेळोवेळी त्याची कापणी आणि छाटणी करणे आवश्यक असते. सुकलेली किंवा पिवळ्या रंगातील पाने काढून टाका.
मनी प्लांटच्या वाढीसाठी जैविद खताचा वापर करावा. यामुळे रोपाची लवकर वाढ होते.