आजपासून चंद्र आणि शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. याचा प्रभाव काही राशींवर होणार आहे. तर काहींसाठी हा प्रभाव अनेक संधी आणि धनलाभ घेऊन येणार आहे.
मुंबई : आज (4 जुलै), शनिवारी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी आहे. या तिथीचा स्वामी शेषनाग आहे. याची आजच्या दिवशी पूजा करावी. याशिवाय शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यासोबत चंद्र देखील मकर राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. एकाच वेळी या दोन्ही ग्रहकांचे परिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचे 12 राशींचे राशीभविष्य...

मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकते. रिलेशनशिपमध्ये वाद सुरू असल्यास ते दूर होतील. यासह व्यावसायातही नफा होण्याची शक्यता आहे.
वृषभ रास
करियरसंदर्भात असणाऱ्या शंका दूर होतील. एखाद्या गंभीर विषयावर मित्रपरिवारामध्ये चर्चा होतील. नातेसंबंधात गोडवा येईल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडासा गोंधळाचा राहणार आहे. आर्थिक दबाबाची स्थिती निर्माण होऊ शकते. कामात थकवा आणि चिडचिड होण्याची शक्यता आहे. यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज कोणासोबतही वादाची स्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
कर्क रास
पार्टनरसोबतचे नाते अधिक खुलले जाईल. नात्यातील दूरावा दूर होईल. एखादा मोठा खर्च येऊ शकतो. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. शासकीय कामांमध्ये थोडा उशिर होऊ शकतो.
सिंह रास
सिंह राशीतील व्यक्तींची अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. आरोग्यासंबंधित एखादी मोठी समस्या असल्यास डॉक्टरांना गाठा. प्रकृतीबाबत हलगर्जीपणा करू नका. नवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या.
कन्या रास
कन्या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस खास आहे. नात्यामध्ये आणि घरातील मंडळींसोबत आनंदाचे वातावरण राहिल. पण एखाद्यावर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
तुळ रास
तुम्हाला आज कोणत्याही कामात घरातील मंडळींची साथ लाभणार आहे. जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. संध्याकाळही तुमची उत्तम जाणार आहे. आर्थिक लाभाचाही योग आहे.
वृश्चिक रास
आजचा दिवस वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी आनंदाचा असणार आहे. पण कोणत्याही कामात घाई करणे टाळा. आजची हातातली कामे वेळेत पूर्ण होतील. याशिवाय दीर्घकाळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
धनु रास
घरातील खर्चाकडे लक्ष द्या. अनियंत्रित खर्च करणे टाळा. विद्यार्थ्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परिवारातील सदस्यांचा आदर करा.
मकर रास
आजचा दिवस कामात व्यस्त झाल्यासारखा वाटेल. पण यामधूनही तुम्हाला मित्रपरिवारासाठी वेळ काढता येईल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. पैशांसंदर्भातील कामे पूर्ण होऊ शकतात.
कुंभ रास
आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर रहाल. वैवाहिक आयुष्यात सुख-समाधान लाभेल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. पण तसे होणार नाही.
मीन रास
पार्टनरसोबत उत्तम वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार चांगला आहे. नोकरदार वर्गासाठीही संधी घेऊन येणारा ठरणार आहे. आर्थिक लाभ, पगारामध्ये वाढ होऊ शकते.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


