बदलणारं हवामान आपल्या हातात नाही, पण केसांची काळजी घेणं नक्कीच आहे. हा सोपा आणि स्वस्तात मस्त हेअर पॅक तुमच्या शॉर्ट हेअरला मऊ, चमकदार आणि हेल्दी ठेवेल. त्यामुळे केस कधीच विस्कटलेल्या घरट्यासारखे दिसणार नाहीत.
हवामान बदललं की त्वचेसोबत केसही लगेच प्रतिसाद देतात. कधी केस अचानक कोरडे होतात, कधी स्काल्प तेलकट होतो, तर कधी केस निस्तेज आणि फ्रिझी (frizzy) दिसू लागतात. शॉर्ट हेअरमध्ये ही समस्या जास्तच जाणवते. कारण लहान केसांमधला कोरडेपणा आणि विस्कटलेपणा लगेच दिसून येतो. केसांमधला ओलावा थोडा जरी कमी झाला, की ते अगदी 'पक्ष्याच्या घरट्या'सारखे विस्कटलेले आणि उभे दिसू लागतात. तुमचे छोटे केस प्रत्येक ऋतूत मऊ, चमकदार आणि सेट राहावेत असं वाटत असेल, तर आठवड्यातून एकदा हा डीप हायड्रेटिंग घरगुती हेअर पॅक (Homemade Hair Pack) नक्की लावा.
डीप हायड्रेशन स्मूथनिंग हेअर पॅक
हा पॅक खास करून बदलत्या हवामानासाठी (उदा. हिवाळ्यातून उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना) तयार करण्यात आला आहे.
- २ मोठे चमचे ताजं दही (Curd)
- १ मोठा चमचा कोरफड जेल (Aloe Vera Gel)
- १ छोटा चमचा नारळाचं तेल (Coconut Oil)
- १ छोटा चमचा मध (Honey)
- (ऐच्छिक) व्हिटॅमिन ई तेलाचे ४-५ थेंब (Vitamin E Oil)
हा हेअर पॅक काम कसा करतो?
- दह्यामध्ये असलेलं लॅक्टिक ॲसिड स्काल्प स्वच्छ करतं आणि केसांना मुलायम बनवतं. यामुळे कोंडा कमी होतो.
- कोरफड केसांमधला ओलावा टिकवून ठेवते. यामुळे लहान केस जे हवेत उडतात, ती समस्या नियंत्रणात येते.
- नारळाचं तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन प्रोटीनचं नुकसान कमी करतं. त्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
- मध हवेतील ओलावा शोषून घेतो आणि तो केसांमध्ये टिकवून ठेवतो. बदलत्या हवामानात हा घटक खूप महत्त्वाचा आहे.
- व्हिटॅमिन ईमुळे केसांना अतिरिक्त मऊपणा आणि चमकदार लुक मिळतो.
हेअर पॅक लावण्याची योग्य पद्धत
- केस थोडे ओले करून घ्या.
- हा पॅक स्काल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत ब्रशने किंवा हाताने लावा.
- ५ मिनिटं हलक्या हातांनी मसाज करा.
- त्यानंतर शॉवर कॅप घाला.
- ३० मिनिटांनी सौम्य, सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवा.
- यामुळे तुम्हाला कंडिशनर लावण्याची गरज भासणार नाही.
- हा पॅक आठवड्यातून एकदा लावा. पण जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर आठवड्यातून दोनदा आणि स्काल्प तेलकट असेल तर १० दिवसांतून एकदा लावा.


