Kitchen Hacks : चहा किंवा कॉफीचे डाग खूपच हट्टी असतात. कॉफीचे डाग पडणे ही एक सामान्य घटना आहे. पण जर हे डाग लवकर काढले नाहीत तर ते निघणे कठीण होऊ शकते आणि कपडे खराब होण्याची शक्यता असते.
Kitchen Hacks : चहा किंवा कॉफीचे डाग आपल्या आवडत्या कपड्यांवर पडले की ते काढणे खूप कठीण असते. चहा किंवा कॉफीचे डाग खूपच हट्टी असतात. कॉफीचे डाग पडणे ही एक सामान्य घटना आहे. पण जर हे डाग लवकर काढले नाहीत तर ते निघणे कठीण होऊ शकते आणि कपडे खराब होण्याची शक्यता असते. बाजारात अनेक प्रकारचे डिटर्जंट असले तरीही अनेक वेळा त्यांचा वापर करूनही फारसा फायदा होत नाही. बाजारात आजकाल अनेक प्रकारचे लिक्विड मिळतात ज्यात कॉफीचे डाग सहज काढण्याची हमी दिली जाते. त्याहूनही त्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून राहता येते.
चहा आणि कॉफीचे डाग काढण्यासाठी काही टिप्स पाहूया:
* थंड पाणी सर्वात महत्त्वाचे आहे. डाग पडताच कपडे थंड पाण्यात भिजवा. यामुळे चहा-कॉफीचा रंग बसू शकणार नाही.
* त्या डागावर डिटर्जंट किंवा साबण लावा. लिक्वीड डिटर्जंट लावून हलके घासा. डाग निघताना दिसेल.
* व्हिनेगर आणि पाणी लावा. जुने डाग काढण्यासाठी समान प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी मिसळून वापरा. लगेचच चांगले परिणाम मिळतील.
* एंझाइम डिटर्जंट खूप उपयोगी आहे. खूप कडक डाग असल्यास एंझाइमयुक्त डिटर्जंट सर्वात प्रभावी आहे.
तेलाचे डाग काढण्यासाठी काय वापरता येते ते जाणून घ्या:
* डाग पडताच जास्तीचे तेल कागद किंवा टिश्यूने हलक्या हाताने काढून टाका.
* बेकिंग सोडा वापरू शकता. तेलाच्या डागावर बेकिंग सोडा शिंपडा. हे जास्तीचे तेल शोषून घेते.
* डिशवॉशिंग लिक्विडनेही डाग निघू शकतात. काही वेळानंतर डागावर थोडे डिशवॉशिंग लिक्विड लावून हलक्या हाताने घासा. नंतर थंड पाण्याने धुवा.
डाग पूर्णपणे निघेपर्यंत कधीही ड्रायरमध्ये सुकवू नका कारण उष्णतेमुळे डाग कायमचे राहू शकतात. कपड्यावरील लेबल तपासा. काही कपडे जास्त घासल्याने किंवा कडक रसायने वापरल्याने खराब होऊ शकतात. घरात असलेले पदार्थ जसे की लिंबाचा रस, कॉर्नस्टार्च, कॉर्नफ्लॉवर हे देखील डाग काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.


