सार

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कामाचा ताण एवढा वाढलेला आहे की, व्यक्तीला स्वत:साठी थोडा वेळ काढता येत नाही. दिवसरात्र काम करत राहिल्याने कालांतराने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यास सुरुवात होते. यावर उपाय काय जाणून घेऊया. 

Dark Circle Under Eye Remedies : डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे आजकाल ही खूपच सर्वसामान्य बाब ठरली आहे. मुलींच्या डोळ्यांखाली आलेले हे डाग तुम्हाला नेहमीच त्रासदायक ठरतात. याची अनेक कारणं असू शकतात. झोप पूर्ण न होणं, तणावग्रस्त असणं, वाढतं वय, आपल्या मोबाईलवर तासनतास बघत बसणं अशी अनेक कारणं आहेत. या समस्येपासून दूर राहण्यासाठी पुढील काही घरगुती उपाय करू शकता. 

टोमॅटो 
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात असणारी पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याची क्षमता वाढते. दृष्टी, पचनक्रिया, रक्तप्रवाह यांची देखभाल करण्यासाठीही टॉमेटोचा उपयोग होतो. तुम्हाला या गोष्टी कदाचित माहीत असतील पण तुम्हाला हे माहीत आहे का? टॉमेटो हा एक ब्लिचींग एजंटदेखील आहे. एका वाटीत एक चमचा टॉमेटोचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा.. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण तुम्ही तुमच्या डोळ्यांखालच्या काळ्या झालेल्या वर्तुळांना लावा. 10 मिनिट्स हे तसंच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

बटाटा

टॉमेटोप्रमाणेच बटाटादेखील तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतो. काळ्या डागांना हे काढून टाकण्यासाठी मदत करतं आणि त्याशिवाय झोपल्यानंतर डोळ्यांना येणारी सूजही कमी करतो. 1 अथवा 2 थंड बटाट्याचा रस काढून घ्या. या रसामध्ये कापसाचा बोळा घालून मग तुमच्या डोळ्यांवर ठेवा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या

बदाम तेल 

बदाम केवळ तुमच्या केसांसाठी नाही तर तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असणारे विटामिन ई त्वचेसाठी वरदान ठरतं. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या काळ्या वर्तुळांना बदामाचं तेल लावा. लावल्यावर मसाज करा जेणेकरून तेल तुमच्या त्वचेमध्ये मुरू द्यावं. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुवा.

हेही वाचा : 

सकाळी पोट साफ होण्यासाठी काय करायला हवं, उपाय जाणून घ्या

सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स, दिवसरभर रहाल उत्साही

टी बॅग्स

चहामध्ये कॅफेन आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी चहा पिऊन तुम्हाला ताजंतवानं वाटतं. तुमच्या डोळ्यांच्या पफीनेससाठी हा पर्याय खूपच चांगला ठरतो. 2 टी बॅग्स फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर तुमच्या दोन्ही डोळ्यांवर ठेवा. 10-15 मिनिटे तसेच राहू द्या आणि मग थंड पाण्याने डोळे धुवा.

हळद 

हळद हे फक्त पदार्थांमध्ये वापरण्याची वस्तू नाही. तुमच्या त्वचेसाठीही हळद गुणकारी असते. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे सर्वांना माहीत आहेच. पण तुमच्या डोळ्यांखालील डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. एका वाटीत अननसाचा रस काढून घ्या. यामध्ये 2 चमचे हळद घालून मिक्स करा. ही पेस्ट व्यवस्थित तयार झाली की काळ्या वर्तुळांवर लावा आणि सुकण्यासाठी साधारण 10 मिनिटे वाट पाहा. सुकल्यावर ओल्या कपड्याने पुसून घ्या.