चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय, खुलेल सौंदर्य
- FB
- TW
- Linkdin
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी उपाय
चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट दूर करण्याच्या नादात अनेक बहुतांश महिला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिनचा वापर करतात. पण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्यास चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली जाते. अशातच निस्तेज त्वचेसह आणि चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असल्यास पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
पपई
मऊ आणि कोमल त्वचेसाठी पपई फायदेशीर ठरते. पपईमध्ये पपीन नावाचे तत्व असल्याने त्वचेचे आरोग्य उत्तम राखले जाते. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी पपईचा गर बारीक वाटून घेत त्यात एक चमचा मध मिक्स करत त्याची पेस्ट तयार करा. त्वचा कोरडी असल्यास त्यामध्ये मिल्क-क्रीमही मिक्स करू शकता. तेलकट त्वचा असल्यास पपईच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबू रस मिक्स करू शकता. हे मिश्रण दररोज लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.
कोरफड
त्वचा आणि चेहऱ्याची सुंदरता कायम राखण्यासाठी कोरफड रामबाण उपाय आहे. कोरफड ब्लॅक स्पॉट्स रिमूव्हल क्रिम म्हणून काम करते. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई तेल आणि लिंबू रस मिक्स करत एक पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.
पाणी
दिवसभपात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे असे सांगितले जाते. खरंतर, पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. पाणी त्वचेचे सौंदर्य उजवळण्यासह त्वचेवर तेज आणण्यास मदत करते. परंतु पाणी पिताना शुद्ध पाणी प्यावे. यामध्ये अल्कोहोल, कार्बोनेटेड ड्रिंक्स मिक्स करु नका. दररोजच्या रुटीनमध्ये पाण्यासह विविध फळांचे ज्यूस देखील पिऊ शकता.
ताक
ताक पिणे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळते जे चेहऱ्यावर येणारे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. त्वचेवरील ताक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
गुडघ्यापर्यंत लांबसडक होतील केस, या बियांपासून घरीच तयार करा हेयर मास्क
वयाच्या पंन्नाशीत महिलांसाठी आवश्यक 3 Vitamin, हाडं होतील बळकट