सार
केसांना चमक येण्यासह हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. बहुतांश महिला पार्लरमध्ये जाऊन हेयर केअर ट्रिटमेंट करतात. पण तुम्ही घरच्याघरीच काही सोप्या उपायांनी केसांची काळजी घेऊ शकता.
Hair Care Tips : घरच्याघरीच केसांची काळजी घेण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. यापैकीच एक म्हणजे अळशीच्या बियांचा (Flaxseed) वापर करा. अळशीच्या बियांमुळे केस हेल्दी राहण्यासह चमक देखील येईल. खरंतर, अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असल्याने केसांमध्ये दमटपणा टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय फॅटी अॅसिड्स केस हाइड्रेट ठेवण्यासह कोरडे आणि तुटण्यापासून दूर ठेवते.
अळशीच्या बियांमधील पोषण तत्त्वे
अळशीच्या बिया प्रोटीनचा उत्तम स्रोत मानले जाते. यामुळे केस वाढीस मदत होऊ शकते. केस गळती, केसांना मजबूती येण्यासाठी बहुतांशजण अशळीच्या बियांचा वापर करण्याचा सल्ला देतात. या बियांमध्ये काही महत्वाचे व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स असतात. जसे की, बी व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि झिंक अशी पोषण तत्त्वे अळशीमध्ये असल्याने केस मजबूत राहण्यासह हेल्दी राहतात. तुम्हाला केस गळतीच्या समस्येचा सामना करत असल्यास अळशीच्या बियांचा हेयर मास्क तयार करुन केसांना लावू शकता.
असा तयार करा हेयर मास्क
एका मोठ्या भांड्यामध्ये दोन चमचे अळशीच्या बिया घेऊन त्यामध्ये एक कप पाणी टाका. रात्रभर किंवा कमीत कमी 2 तास अळशीच्या बिया भिजवून ठेवा. यानंतर पाण्यासह अळशीच्या बिया मिक्समरमध्ये वाटून घ्या. या बियांची घट्ट पेस्ट तयार होईल. आता पेस्ट गाळणी अथवा सुती कापडामध्ये बांधून गाळून घ्या. यामुळे बियांमधील जेल वेगळे होईल. जेल एका डब्यात भरुन ठेवा. हवं असल्यास जेलमध्ये 1-2 चमचे मध, 1 चमचा नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करु शकता. यामुळे केसांना अतिरिक्त ओलसरपणा आणि पोषण देईल.
हेयर मास्क आधी पॅच टेस्ट
अळशीच्या बियांचे जेल केसांची मूळ आणि केसांवर लावा. अर्धा तासानंतर केस शॅम्पूने धुवा. यामुळे केसांना चमक येण्यासह मऊ होतील. आठवड्यातून एक ते दोन वेळा अळशीच्या बियांचा हेयर मास्क केसांना लावू शकता. एखाद्या व्यक्तीला अळशीच्या बियांपासून अॅलर्जी असल्यास त्याने यापासून तयार केलेला हेयर मास्क लावू नये. याशिवाय हेयर मास्क लावण्याआधी पॅच टेस्टही नक्की करावी.
आणखी वाचा :
सणासुदीवेळी परफेक्ट आहेत Sonalee Kulkarni च्या ब्लाऊजचे 8 हटके डिझाइन
वयाच्या पंन्नाशीत महिलांसाठी आवश्यक 3 Vitamin, हाडं होतील बळकट