सार
वर्ष 2024 मधील चौथा महिना एप्रिलमध्ये काही सण-उत्सव साजरे केले जाणार आहे. याशिवाय यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहणही एप्रिलमध्ये असणार आहे. जाणून घेऊया एप्रिल महिन्यातील सण-उत्सवांबद्दल अधिक...
April 2024 Festival List : अवघ्या काही दिवसांनी नवीन महिना म्हणजेच एप्रिल सुरू होणार आहे. या महिन्यात हिंदू नववर्ष 2081 सुरू होणार आहे. याशिवाय गुढी पाडवा, राम नवमीसह हनुमान जयंती देखील एप्रिल महिन्यात साजरी केली जाणार आहे. जाणून घेऊया एप्रिल महिन्यातील सण-उत्सावांच्या तारखांबद्दल सविस्तर...
एप्रिल महिन्यातील सण-उत्सव
- 9 एप्रिल - गुढी पाडवा
- 11 एप्रिल- रमजान ईद
- 17 एप्रिल - श्रीराम नवमी
- 23 एप्रिल - हनुमान जन्मोत्सव
- 27 एप्रिल - संकष्टी चतुर्थी
कधीपासून सुरू होणार विक्रम संवत
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, यंदा हिंदू नववर्ष विक्रम संवत 2081 ची सुरूवात 9 एप्रिल (मंगळवार) पासून होणार आहे. या नववर्षाचे नाव पिंगल आहे. खरंतर हे नववर्ष मंगळवार पासून सुरू होत असल्याने याचा राजा मंगळ आणि मंत्री शनिदेव असणार आहेत. याशिवाय 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्री देखील सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त गुढी पाडव्याचा सणही साजरा केला जाणार आहे.
यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी?
वर्ष 2024 मधील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यातच असणार आहे. पण भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. यामुळे सूतक काळ किंवा कोणत्याही नियमांचे पालन करावे लागणार नाही. केवळ परदेशात सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील अमावस्या म्हणजेच 8 एप्रिल (सोमवारी) असणार आहे.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
आंध्र प्रदेशात अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते होळी, पुरुष महिलांप्रमाणे साज करत साजरा करतात सण
नव्या आर्थिक वर्षात बदलणार हे नियम ज्याचा तुमच्यावर थेट होणार परिणाम
गुढी पाडव्याला सेलेब्रिटींसारखा असा करा मराठमोठा लुक, दिसाल सुंदर