Marathi

वेगाने लठ्ठपणा कमी करायचाय? डाएटमध्ये प्या 5 हेल्दी ज्यूस

Marathi

लठ्ठपणा कमी करण्यासाठी हेल्दी ज्यूस

सध्याच्या वेगाने बदलत चाललेल्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाचा सामना करत आहे. अशातच वजन कमी करण्यासाठी पुढील काही हेल्दी ज्यूसचा पर्याय निवडू शकता.

Image credits: Getty
Marathi

बीटाचा ज्यूस

वजन कमी करण्यासाठी बीटाचा ज्यूस पिऊ शकता. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. याशिवाय शरिर डिटॉक्स करण्यासाठी बीटाचा ज्यूस फायदेशीर आहे.

Image credits: pexels
Marathi

पालक ज्यूस

पालक हेल्दी डाएटचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरिराला पुरेशा प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो. याशिवाय लठ्ठपणाची समस्या वेगाने कमी होऊ शकते.

Image credits: social media
Marathi

दूधीचा ज्यूस

दूधीच्या ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. डाएटमध्ये तुम्ही दूधीचा ज्यूस पिऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

कोबीचा ज्यूस

कोबीचा ज्यूस प्यायल्याने पोटासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कोबीचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरू शकते. ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिक्स करू शकता.

Image credits: pexels
Marathi

गाजर

वजन कमी करण्यासाठी गाजराचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फायबरचे प्रमाण अत्याधिक असण्यासह कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

Image credits: Freepik
Marathi

Disclaimer :

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: freepik