MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Health Tips : पावसाळ्यात मोड आलेले बटाटे किंवा बीट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक?

Health Tips : पावसाळ्यात मोड आलेले बटाटे किंवा बीट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक?

मुंबई : पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन करणे टाळावे असे सांगितले जाते. बटाटे किंवा बीट दीर्घकाळ न वापरल्यास त्यांना मोड  येऊ लागतात. मात्र बहुतांश महिला बटाट्यांना आलेले मोड काढून त्याची एखादी भाजी तयार करतात. पण खरंच, असे बटाटे किंवा बीट खावेत का?

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jul 09 2025, 01:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मोड आलेले बटाटे किंवा बीटाचे सेवन करावे का?
Image Credit : Social Media

मोड आलेले बटाटे किंवा बीटाचे सेवन करावे का?

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. बटाटे किंवा बीटसारख्या मुळभाज्या जर नीट साठवले नाहीत, तर त्यांना लवकरच मोड येतात किंवा सडू लागतात. मोड आलेल्या भाज्या पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. अशा भाज्या खाणे सुरक्षित आहे का? काहीजण असा समज करून घेतात की मोड आलेले बटाटे किंवा बीट अधिक पोषक असतात, पण ही समजूत अर्धवट माहितीवर आधारित असू शकते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मोड आलेल्या बटाट्यांमुळे नुकसान
Image Credit : Social Media

मोड आलेल्या बटाट्यांमुळे नुकसान

बटाट्यांबाबत बोलायचे झाले, तर त्यामध्ये सोलानिन (Solanine) नावाचा विषारी घटक आढळतो जो विशेषतः बटाट्यांना मोड आल्यावर किंवा ते हिरवे पडल्यावर अधिक प्रमाणात तयार होतो. सोलानिन शरीरात गेल्यास अपचन, उलटी, डोकेदुखी, आणि कधी कधी विषबाधाही होऊ शकते. पावसाळ्यात बटाटे ओलसर ठिकाणी ठेवल्यास त्यांना लवकर मोड येतात, आणि अशा वेळी त्यांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागते. बटाट्यांच्या सालीवर हिरवे डाग दिसल्यास किंवा मोड आले असल्यास, अशा भागांना पूर्णपणे कापून टाकून वापरणे योग्य ठरेल. मात्र, खूपच मोड आलेले किंवा सडलेले बटाटे खाणे आरोग्यास घातक असते.

Related Articles

Related image1
पावसाळ्यात घरी बनवलेली पाणीपुरी खाल्यावर होतात 'हे' फायदे
Related image2
पावसाळ्यात सर्दी, खोकला झाल्यावर घरगुती कोणते उपाय करावेत?
35
आरोग्यासंंबंधित समस्या
Image Credit : Social Media

आरोग्यासंंबंधित समस्या

पावसाळ्यात मोड आलेले बटाटे खाणे टाळावे, कारण त्यातून सोलानिनसारखे विषारी घटक मिळू शकतात. बीटचे थोडेसे मोड येणे तितके घातक नसले तरी त्याच्या पोषणमूल्यांवर परिणाम होतो. त्यामुळे या भाज्या वापरण्याआधी त्यांची अवस्था बारकाईने पाहूनच निर्णय घ्यावा. ओल्या हवामानात अन्नसाठवणुकीकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहता येते.

45
मोड आलेले बीट
Image Credit : Social Media

मोड आलेले बीट

बीटच्या बाबतीत थोडी वेगळी परिस्थिती आहे. बीटमध्ये सोलानिनसारखा घातक पदार्थ नसतो. मोड आलेले बीट तितकेसे घातक नसले तरी त्यांची पोषणमूल्ये कमी होतात आणि चवही बदलते. त्यामधील साखर आणि अँटीऑक्सिडंट्स मोडांच्या प्रक्रियेत कमी होतात.

55
खराब झालेले बीट खाणे टाळा
Image Credit : Social Media

खराब झालेले बीट खाणे टाळा

बीट जर थोडा मोडलेला आणि टवटवीत वाटत असेल, तर तो योग्यरीत्या धुवून आणि साले काढून वापरता येतो. मात्र, जर बीट मऊ पडलेला, वास येणारा किंवा सडण्याच्या अवस्थेत असेल, तर त्याचा वापर टाळावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Dhanteras Shopping : धनत्रयोदशीला या वस्तू घरी आणा, लक्ष्मीची कृपा नक्की होईल
Recommended image2
Morning Routine : सकाळी ब्रश न करता पाणी पिताय? मग हे नक्की वाचा
Recommended image3
Snow Destinations In November : नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी पाहायचीय? या ५ स्वस्त ठिकाणांना नक्की भेट द्या
Recommended image4
Dhanteras 2026 : धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तूंचं नेमकं काय करायचं?
Recommended image5
Angel Number 1111 : तुम्हालाही वारंवार 11:11 हा आकडा दिसतोय? यामागचं खरं कारण जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
पावसाळ्यात घरी बनवलेली पाणीपुरी खाल्यावर होतात 'हे' फायदे
Recommended image2
पावसाळ्यात सर्दी, खोकला झाल्यावर घरगुती कोणते उपाय करावेत?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved