सार

Breast Cancer : वैद्यकीय क्षेत्रात एक मोठा प्रयोग यशस्वी झाला आहे. याद्वारे शास्त्रज्ञांनी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करण्यासाठी सेन्सर स्ट्रिप तयार केले आहे. ज्याद्वारे काही सेकंदांत या आजाराचे निदान होण्यास मदत मिळू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी अनेक महिला या आजारास बळी पडतात. कित्येक जणींना ब्रेस्ट कॅन्सरमुळे जीवही गमवावा लागतो. तसेच प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर रुग्णाला वेदनादायक वैद्यकीय चाचण्यांचा सामना करावा लागतो. पण लवकरच या त्रासातून सुटका होण्यास मदत मिळू शकते. कारण आता शास्त्रज्ञांनी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करण्यासाठी एक सोपी पद्धत शोधून काढली आहे.

लाळेच्या चाचणीद्वारे ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करू शकणारे उपकरण अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. या संशोधनाबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया...

संशोधनातील महत्त्वपूर्ण माहिती

13 फेब्रुवारी 2024 रोजी 'जर्नल ऑफ व्हॅक्यूम सायन्स अँड टेक्नॉलॉजी बी'मध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, एक नवीन बायोसेन्सर (Handheld Biosensor) विकसित करण्यात आले आहे. ज्याद्वारे लाळेच्या नमुन्यातून ब्रेस्ट कॅन्सरचे निदान केले जाऊ शकते. 

संशोधन करताना शास्त्रज्ञांनी या सेन्सरद्वारे 21 महिलांची तपासणी देखील केली. विकसित करण्यात आलेले स्ट्रिप ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील व पुढील टप्प्यातील फरकाची देखील माहिती देऊ शकते, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करणारे स्ट्रिप कसे करते काम?

फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञ हसिओ-ह्सुआन वान यांनी सांगितले की, लाळेचे नमुने स्ट्रिपवर ठेवले जातात, त्यानंतर या नमुन्यांची तांत्रिक पद्धतीने चाचणी केली जाते. चाचणीदरम्यान कॅन्सरच्या संभाव्य धोक्याबाबत माहिती देण्यासाठी इलेक्ट्रोडचे आउटपुट सिग्नल दर्शवतात. महत्त्वाचे म्हणजे एक चाचणी करण्यासाठी पाच सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. याबाबत अधिक माहिती देताना शास्त्रज्ञ म्हणाले की, शेवटी आम्ही एक तंत्रज्ञान तयार केले आहे. ज्यामध्ये जगभरातील लोकांना मदत करण्याची क्षमता आहे. या स्ट्रिप चाचणीची किंमत जवळपास 415 रुपये ($5) इतकी आहे. म्हणजे कॅन्सरचे निदान जाणून घेण्यासाठी MRIसह अन्य महागड्या चाचण्यांपासून आपली सुटका होऊ शकते.

आणखी वाचा

अमेरिकेत आढळला Bubonic प्लेगचा रुग्ण, एकेकाळी या महामारीमुळे 50 दशलक्ष लोकांचा गेलाय बळी

RRB Technician Recruitment 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशिअन पदासाठी 9 हजार रिक्त जागांवर होणार भरती, इतका मिळणार पगार

Khandoba Temple : खंडोबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश