Health Care : तुम्ही दररोज चपाती खाता? वेळीच काळजी घ्या अन्यथा...
Health Care : अनेक लोक भाताऐवजी चपाती खाण्याला जास्त पसंती देतात. कारण त्यांना वाटतं की चपाती खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि शुगर नियंत्रणात राहते. त्यामुळे ते रोज चपाती खातात. पण रोज चपाती खाल्ल्याने किती समस्या येऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का?

चपाती
भातापेक्षा चपाती आरोग्यासाठी चांगली मानली जाते. कारण त्यात कर्बोदके कमी असतात. पण रोज जास्त चपात्या खाल्ल्याने अनेक समस्या येऊ शकतात. जसे की वजन वाढणे आणि रक्तातील साखर वाढणे.
रक्तातील साखर वाढते
मधुमेहींनी रोज जास्त चपात्या खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. गव्हाच्या चपातीमधील ग्लूटेन साखर वाढवते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रोज चपाती खाणे टाळावे.
वजन वाढू शकते
वजन कमी करण्यासाठी अनेकजण चपाती खातात. पण चपातीमध्येही कर्बोदके असल्याने तुमचे वजन वेगाने वाढू शकते. त्यामुळे रोज जास्त प्रमाणात चपात्या खाणे टाळावे.
पचनाच्या समस्या
ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या आहेत, त्यांनी रोज चपाती खाऊ नये. कारण गव्हाची चपाती पचायला जड असते आणि यामुळे पचनाच्या समस्या आणखी वाढू शकतात.
हायपोथायरॉईडीझम
ज्यांना हायपोथायरॉईडीझमचा त्रास आहे, त्यांनी रोज गव्हाची चपाती खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, गहू ही समस्या आणखी वाढवू शकतो. त्यामुळे दिवसातून जास्त चपात्या खाऊ नका.
थकवा जाणवतो
बऱ्याच लोकांना गव्हाची चपाती खाल्ल्यानंतर लगेच थकवा जाणवतो आणि आळस येतो. याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही.

