- Home
- lifestyle
- Health Care : वयाच्या 35 व्या वर्षी करा या स्क्रिनिंग टेस्ट, वेळेआधीच होईल कॅन्सरचे निदान
Health Care : वयाच्या 35 व्या वर्षी करा या स्क्रिनिंग टेस्ट, वेळेआधीच होईल कॅन्सरचे निदान
Health Care : वयाच्या ३५ वर्षानंतर शरीरात अनेक जैविक आणि हार्मोनल बदल होऊ लागतात. या वयात अनेक आजारांचा धोका वाढतो, विशेषतः कॅन्सरचा. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीसह काही महत्त्वाच्या स्क्रिनिंग टेस्ट्स करणे अत्यावश्यक ठरते.

महिलांसाठी – सर्व्हिकल आणि ब्रेस्ट कॅन्सर तपासणी
महिलांनी वयाच्या ३०-३५ नंतर दोन महत्त्वाच्या तपासण्या नियमित कराव्यात – (अ) पॅप स्मीअर टेस्ट (Pap Smear Test) : ही तपासणी गर्भाशयाच्या मुखातील (Cervix) पेशींमध्ये झालेल्या बदलांचे निदान करते. सर्व्हिकल कॅन्सर हा भारतातील महिलांमधील सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. ३५ वर्षांनंतर दर ३ वर्षांनी ही तपासणी करणे आवश्यक आहे. (ब) मॅमोग्राफी (Mammography) : स्तनातील गाठ किंवा पेशींचे असामान्य वाढीचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी केली जाते. ब्रेस्ट कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. ३५ वर्षांनंतर दर दोन वर्षांनी ही तपासणी करणे योग्य ठरते.
पुरुष आणि महिला दोघांसाठी समान स्क्रिनिंग
काही कॅन्सर प्रकार दोघांनाही समान प्रमाणात होऊ शकतात.
(अ) लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) : मद्यपान, व्हायरल इंफेक्शन (Hepatitis B/C) किंवा फॅटी लिव्हरमुळे लिव्हर कॅन्सरचा धोका असतो. दरवर्षी एकदा LFT करावी.
(ब) लो डोस CT स्कॅन (Low Dose CT Scan) : दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका ओळखण्यासाठी ही तपासणी करावी. (क) स्किन कॅन्सर स्क्रिनिंग : त्वचेवर असामान्य डाग, गाठी किंवा रंगातील बदल दिसल्यास त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेऊन स्क्रिनिंग करणे महत्त्वाचे आहे.
पुरुषांसाठी – प्रोस्टेट आणि कोलन कॅन्सर तपासणी
पुरुषांमध्ये वय वाढल्यास प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित समस्या वाढतात.
(अ) पीएसए टेस्ट (PSA Test – Prostate-Specific Antigen) : रक्तातील PSA पातळी वाढल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका संभवतो. ही तपासणी दर दोन वर्षांनी करावी.
(ब) कोलोनोस्कोपी (Colonoscopy) : मोठ्या आतड्यातील पॉलिप्स किंवा कॅन्सरसदृश वाढ ओळखण्यासाठी ही तपासणी उपयुक्त आहे. ३५ वर्षांनंतर पचनसंस्थेशी संबंधित अडचणी असल्यास ही टेस्ट करणे आवश्यक आहे.
नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व
कॅन्सर लवकर टप्प्यात ओळखला तर उपचार शक्य होतात. म्हणून, ३५ वर्षांनंतर वार्षिक फुल बॉडी चेकअप करणे आवश्यक आहे. यात रक्त तपासणी, थायरॉईड, शुगर, लिपिड प्रोफाइल, तसेच वरील सर्व स्क्रिनिंग टेस्ट्सचा समावेश असावा. जीवनशैलीतील बदल जसे की, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण, आणि तंबाखू-दारूचे सेवन टाळणे. यामुळे कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

