- Home
- lifestyle
- Diwali 2023 Wishes in Marathi : नातेवाईकांसह मित्रमैत्रिणींना या खास संदेशांसह पाठवा दिवाळीच्या शुभेच्छा
Diwali 2023 Wishes in Marathi : नातेवाईकांसह मित्रमैत्रिणींना या खास संदेशांसह पाठवा दिवाळीच्या शुभेच्छा
- FB
- TW
- Linkdin
Happy Diwali Wishes In Marathi : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. त्यावेळेस नगरवासीयांनी आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवे लावले होते. तेव्हापासून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे, असे म्हणतात.
दिवाळी सणानिमित्त नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात, सणानिमित्त आसपासच्या वातावरणात उत्साह-सकारात्मकता वाढते, प्रियजनांना वेळ दिला जातो. या शुभप्रसंगी नातेवाईक-मित्र परिवारास शुभेच्छाही (Happy Diwali 2023 SMS In Marathi) दिल्या जातात. आपणही दिवाळी सणाचे हे खास मराठीतून शुभेच्छा संदेश (Diwalichya Marathitun Shubhechha) सर्वांना पाठवा.
दिव्यांचा हा पवित्र सण
तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो अपार
लक्ष्मी माता तुमच्या घरात करो निवास
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना
दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali !
फटाक्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आभाळ
चोहीकडे पसरलंय आनंदाचे वातावरण
दिवाळी घेऊन आली खूप आनंद-उत्साह
प्रत्येक घरात झळकलीय रोषणाई
Happy Diwali !
दिव्यांचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज
सूर्याचे किरण, आनंदाचा वर्षाव
चंदनाचा सुगंध, आपल्यांचे प्रेम
तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali !
तुमच्या अंगणी नांदो सुख-समृद्धी
शांतता व प्रकाशाचा दिवा लावा चहुबाजूंना
आनंद येवो तुमच्या दारी
दिवाळी सण साजरा करण्याची करा जय्यत तयारी
दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा
Happy Diwali 2023 !
आनंदाचा सण आहे दिवाळी
उत्साह वाढवणारा सण आहे दिवाळी
लक्ष्मीपूजनाचा सण आहे दिवाळी
जवळच्या माणसांचे निस्वार्थ प्रेम-माया आहे दिवाळी
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
प्रत्येक घरात येवो सुख-समृद्धी
प्रत्येक जण उत्साहात साजरी करो दिवाळी
प्रेमाने भेट घेऊन सगळ्यांना बोला
Happy Diwali 2023!
आली आली दिवाळी आली
सोबत उत्साह व सुख घेऊन आली
मजा करा, आनंद साजरा करा
तुम्हाला सर्वांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Diwali 2023!
हसत हसत दारी लावा दिवा
जीवनात नवीन आनंदाचे करा स्वागत
स्वतःचे दुःख, कष्ट सारे विसरा
सर्वांना मायेने आपलेसे करा
Happy Diwali 2023 !
लक्ष्मीमातेने घरात केला आहे प्रवेश
सर्वत्र दिसतेय दिव्यांची आरास
दिवाळी या पवित्र सणाच्या
तुम्हाला कोटी-कोटी शुभेच्छा
Happy Diwali 2023!
दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशाने
सर्वांचे जीवन होवो प्रकाशमान
सणाच्या सजावटीने दूर होवो सर्वांच्या समस्या
मिठाई आपल्या जीवनात घेऊन येवो खूप खूप गोडवा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
Diwali 2023 : लक्ष्मीपूजनासाठी किती दिवे लावणे मानले जाते शुभ?