देशभरामध्ये दीपावलीची जोरदार तयारी सुरू आहे. रंगीबेरंगी मिठाई, तोरण, कंदिल, इत्यादी साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यंदा लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरला आहे.
त्रेता युगात प्रभू राम आश्विन अमावस्येला अयोध्येत परतले, तेव्हा नगरवासीयांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला, असे म्हणतात. तेव्हापासूनच या सणाला दिवे लावण्याची परंपरा चालत आली आहे.
दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते, तेव्हा मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात पद्धत आहे. ज्यामुळे लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळतो. घरातील सुख-समृद्धीत वाढ होते.
लक्ष्मीपूजनासाठी किती दिवे लावावे, यासंबंधी ग्रंथांमध्ये कोणताही उल्लेख नाही. पण तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिव्यांची संख्या नेहमी विषम असावी.
लक्ष्मीपूजनासाठी आपल्या ईच्छेनुसार 11, 21 किंवा 51 दिवे लावा. दिव्यांची संख्या कधीही 10, 20 किंवा 30 अशी नसावी. कारण यामध्ये शून्याचा समावेश आहे, जो समाप्तीचा इशारा दर्शवतो.
हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याला पैशांचा आहेर दिला जातो, त्यावेळेस एक रूपयाचा समावेश करण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ 51, 101 अशा पद्धतीने आहेर देतात. कारण ही संख्या शुभ मानली जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.