MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Diwali 2023 Puja-Shubh Muhurat : दिवाळीतील 7 दुर्मिळ योग व लक्ष्मीपूजेसाठी 5 शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Diwali 2023 Puja-Shubh Muhurat : दिवाळीतील 7 दुर्मिळ योग व लक्ष्मीपूजेसाठी 5 शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Diwali 2023 Shubh Muhurat: दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावस्येला दिवाळी सण साजरा केला जातो. यावेळी यंदा अमावस्या तिथि दोन दिवस असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत लोकांच्या मनात गोंधळ आहे. जाणून घेऊया यंदा दिवाळी सण नेमका कोणत्या तारखेला साजरा करावा? 

3 Min read
Harshada Shirsekar
Published : Nov 11 2023, 03:58 PM IST| Updated : Nov 11 2023, 04:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
दिवाळी सण कधी साजरा केला जातो?
Image Credit : Getty

दिवाळी सण कधी साजरा केला जातो?

Diwali 2023 Puja Vidhi-Shubh Muhurat : धार्मिक ग्रंथानुसार दिवाळी सण आश्विन महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दीपावली हा शब्द संस्कृत भाषेमधील दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ व ‘आवली’ म्हणजेच ‘रांग’ किंवा ‘ओळ’. याचा अर्थ असा होतो की दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दीपावली. दीपोत्सवाशी संबंधित मान्यता आणि परंपरांमुळे हा सण इतर सणांपेक्षा अधिक खास ठरतो.

पण यंदा दिवाळी सण साजरा करण्याबाबत लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. कारण आश्विन अमावस्या तिथि एक नव्हे तर दोन दिवस आहे. मंडळींनो गोंधळ जाऊ नका. जाणून घेऊया दिवाळी सणाची अचूक तिथि, पूजा विधि, शुभ मुहूर्त यासह संपूर्ण व सविस्तर माहिती…

28
यंदा दिवाळी सण कधी आहे? (Kadhi Ahe Diwali 2023)
Image Credit : Getty

यंदा दिवाळी सण कधी आहे? (Kadhi Ahe Diwali 2023)

पंचांगानुसार आश्विन अमावस्या तिथि 12 नोव्हेंबरला (रविवार) दुपारी 02 वाजून 45 मिनिटाला सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला (सोमवार) दुपारी 02 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील. ग्रंथांनुसार दिवाळी दिवशी अमावस्या तिथिनुसार संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते आणि त्यामुळे रविवारीच संध्याकाळी लक्ष्मीपूजन व दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जाईल.

(Diwali 2023 Puja Samagri : दिवाळीच्या पूजेचं साहित्य आजच आणा घरी, विसरू नका एकही वस्तू)

38
दिवाळीतील शुभ व दुर्मिळ योग (Diwali 2023 Shubh Yog)
Image Credit : Getty

दिवाळीतील शुभ व दुर्मिळ योग (Diwali 2023 Shubh Yog)

उज्जैनमधील ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्या माहितीनुसार, यंदा दिवाळीत एकाच वेळी पाच राज योग आहेत. यामुळे सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रविवारी म्हणजे 12 नोव्हेंबरला गजकेसरी, हर्ष, उभयचारी, कहल आणि दुर्धरा नावाचे दुर्मिळ योग आहेत. यातील गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त दिवाळीत आयुष्मान व सौभाग्य योगहा आहेत.

(Diwali 2023 Remedies : धनलाभासाठी दिवाळीत करा हे 10 उपाय)

48
दिवाळी 2023 पूजेसाठी शुभ मुहूर्त (Diwali 2023 Shubh Muhurat Detail)
Image Credit : Getty

दिवाळी 2023 पूजेसाठी शुभ मुहूर्त (Diwali 2023 Shubh Muhurat Detail)

  • संध्याकाळी 05 वाजून 59 मिनिटांपासून ते रात्रौ 08 वाजून 33 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. यानुसार पूजेसाठी 2 तास 34 मिनिटे इतका कालावधी मिळेल.
  • चौघडिया मुहूर्त : संध्याकाळी 05 वाजून 59 मिनिटांपासून ते संध्याकाळी 07 वाजून 35 मिनिटांपर्यंत शुभ चौघडी असल्याने हा कालावधी शुभ व अनुकूल आहे.
  • लक्ष्मीपूजनाचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी संध्याकाळी 06.12 वाजेपासून ते 07.35 वाजेपर्यंत पूजा करावी.

(Diwali 2023 : दिवाळीला या 10 ठिकाणी का लावावे दिवे? जाणून घ्या फायदे)

58
पूजा कशी करावी? (Diwali 2023 Puja Vidhi)
Image Credit : Getty

पूजा कशी करावी? (Diwali 2023 Puja Vidhi)

  • पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे व चौरंग मांडावा. त्यावर लाल रंगाचे कापड ठेवा व देवी लक्ष्मी, श्रीगणेशासह देवी सरस्वतीची प्रतिमा ठेवावी.
  • देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ताम्हणामध्ये पैशांच्या नोटा-नाणी नक्की ठेवा. चौरंगावर कलश ठेवा. कलशावर कुंकूने स्वस्तिक काढा. कलशावर आंबाच्या डहाळ्या ठेवून श्रीफळ ठेवावे. खाली नमूद केलेला मंत्र उच्चारुन पूजा सामग्रीवर फुलाने पाणी शिंपडावे -

ऊं अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा।

य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि:।।

68
संकल्प करून पूजा करा
Image Credit : Getty

संकल्प करून पूजा करा

  • यानंतर हातात जल व अक्षता घेऊन पूजा संकल्प करावा. सर्वप्रथम भगवान श्रीगणेश आणि देवी सरस्वतीला हळद -कुंकू लावून पूजा करा. यानंतर श्रीमहालक्ष्मीला हळद-कुंकू लावा व शुद्ध तुपाचा दिवा लावून धूप अगरबत्तीही दाखवा. आपल्या ईच्छेनुसार 11 किंवा 21 दिवे लावावेत.
  • सर्व देवांच्या प्रतिमांवर अबीर, गुलाल, हळदकुंकू, चंदन, अक्षता वाहाव्यात. फुलांचे हार अर्पण करा. अत्तर शिंपडावे व विड्याचे पानही अर्पण करावे. अशाच पद्धतीने कुबेर भगवानाचीही पूजा करावी. पूजा झाल्यानंतर फळ व मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.
  • यानंतर अक्षता घेऊन श्रीगणेश आणि महालक्ष्मी यांची मूर्ती वगळता सर्व पूजनीय देवतांना अक्षता अर्पण करा व पुढील मंत्राचा उच्चार करावा.

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।

इष्टकामसमृद्धयर्थं पुनरागमनाय च।।

  • अशा प्रकारे दीपावलीची पूजा केल्यास घरातील सुख-समृद्धीत वाढ होण्यास मदत मिळेल.
78
लक्ष्मीपूजनाबद्दलची महत्त्वाची माहिती, शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ
Image Credit : Getty

लक्ष्मीपूजनाबद्दलची महत्त्वाची माहिती, शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishal Tarte (@akssyprbhu)

88
DISCLAIMER
Image Credit : Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
Recommended image2
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!
Recommended image3
किंमत कमी, प्रेम अफाट! नातीला द्या '१ ग्रॅम'चे सोन्याचे स्टड; बजेटमध्ये बसणारी सर्वात सुंदर गिफ्ट आयडिया!
Recommended image4
स्वर्गातून थेट खाली! भारतातील 'या' ६ धबधब्यांच्या सौंदर्यापुढे सगळे फिके; वेळ काढून नक्की पाहा!
Recommended image5
फुफ्फुसाचा कर्करोग: या ५ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका! तुम्हाला धोका आहे का? लगेच तपासा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved