Hanuman Jayanti 2025 : यंदा हनुमान जयंती 11 की 12 एप्रिलला? जाणून घ्या योग्य तारीख
Hanuman Jayanti 2025 Date : हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची पूजा-प्रार्थना केली जाते. यंदा हनुमान जयंती कधी साजरी केली जाणार याबद्दल जाणून घेऊया. याशिवाय पूजेचा शुभ मुहूर्तही पाहू.
- FB
- TW
- Linkdin
)
हनुमान जयंती 2025
हिंदू पंचांगानुसार, हनुमान यांचा प्रकट चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या तिथीला झाला होता. काहीजण असे मानतात की, हनुमान यांचा जन्म दिवाळीदरम्यान झाला होता. शिक्षण, विवाह यामध्ये यश मिळणे आणि कर्जातून मुक्तता होण्यासाठी हनुमान जयंतीचा दिवस अत्यंत विशेष असतो.
हनुमान जयंती खास
यंदाची हनुमान जयंती अत्यंत शुभ आहे. या दिवशी ज्या राशीमध्ये शनीची साढेसाती सुरू आहे त्यांना कष्टातून मुक्त होण्यासाठी अत्यंत खास दिवस आहे. जाणून घेऊया यंदा हनुमान जयंती 11 की 12 एप्रिलला असणार आहे.
यंदा हनुमान जयंती कधी?
वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात 11 एप्रिलला पहाटे 3.21 मिनिटांनी होणार असून 13 एप्रिलला 5.51 मिनिटांनी संपणार आहे. अशातच हनुमान जयंती 12 एप्रिलला साजरी केली जाणार आहे.
का साजरी करतात हनुमान जयंती?
भगवान हनुमान हे भगवान शंकराचे रुद्र अवतार आहेत. हनुमान माता अंजनी आणि नारराज केसरीचे पुत्र आहेत. हिंदू शास्रानुसार, भगवान हनुमान आजही धरतीवर जीवंत आहेत. कारण ते चिरंजीवी आहेत. हनुमान जयंतीला बजरंगबली जन्मोत्सवाच्या रुपाचही साजरी केले जाते. हा दिवस रामनवमीच्या काही दिवसानंतर येतो.
हनुमानाची नावे
बजरंगबली, सुंदर मारुती नंदन, पवन पुत्र, अंजनी नंदन आणि संकट मोचन अशा वेगवेगळ्या नावाने भगवान हनुमानाला ओखळले जाते. असा विश्वास आहे की, ज्या व्यक्ती भगवान हनुमानाची भक्ती करतात त्यांना आयुष्यात यश आणि सुख प्राप्ती होते. भगवान हनुमान भक्ती आणि निष्ठेचे सर्वोत्तम प्रतीक मानले जाते.
हनुमान यांच्याकडील शक्ती
अणिमा सिद्धि, गरिमा सिद्धि, लघिमा सिद्धि, प्राप्ति सिद्धि, प्राकाम्य सिद्धि, महिला सिद्धि, ईशित्व सिद्धि, वशित्व सिद्धि.