आज 20 ऑक्टोबरला हंस राजयोग, या राशींना देवी लक्ष्मीचा मिळणार भरभरुन आशीर्वाद!
Hamsa Rajayoga on 20 October 2025 : दिवाळीच्या मुहूर्तावर बुधादित्य योग तयार होत आहे. याशिवाय, गुरुच्या संक्रमणामुळे आज हंस राजयोगाचा प्रभावही दिसून येईल.

मेष राशी
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराच्या मदतीने महत्त्वाचं काम पूर्ण होईल. मित्राकडून भेटवस्तू मिळू शकते. नशिबामुळे फायदा होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
मिथुन राशी
आज दिवाळीचा दिवस मिथुन राशीसाठी शुभ आणि फायदेशीर असेल. तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला फायदा आणि सन्मान मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तर व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल. प्रेम जीवनात गोडवा राहील.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस आनंददायी असेल. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
तूळ राशी
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस शुभ आणि फायदेशीर असेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन संधी मिळतील. तुमची काही रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नफा आणि सन्मान मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
धनु राशी
धनु राशीसाठी उद्याचा दिवस फायदेशीर आणि आनंददायी असेल. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

