MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Dry Scalp Home Remedy : डोक्याची त्वचा कोरडी झालीय? हे रामबाण उपाय करून मिळवा समस्येतून सुटका

Dry Scalp Home Remedy : डोक्याची त्वचा कोरडी झालीय? हे रामबाण उपाय करून मिळवा समस्येतून सुटका

Hair Care Tips : ड्राय स्कॅल्पमुळे केस तुटणे, केस कोरडे होणे, कोंडा इत्यादी समस्यांमुळे त्रस्त आहात का? तर मग घरच्या घरी करा हे सोपे उपाय…

2 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Oct 26 2023, 11:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
ड्राय स्कॅल्प म्हणजे नेमके काय?
Image Credit : Getty

ड्राय स्कॅल्प म्हणजे नेमके काय?

डोक्याच्या त्वचेला ‘स्कॅल्प’ असे म्हणतात. डोक्याची त्वचा जेव्हा कोरडी होते, तेव्हा अशा परिस्थितीस ‘ड्राय स्कॅल्प’ (dry, itchy scalp treatment at home) असे म्हटले जाते. स्कॅल्पवरील सीबम म्हणजे नैसर्गिकरित्या होणाऱ्या तेलाचा स्त्राव कमी होऊ लागतो, त्यावेळेस कोंड्यामुळेही स्कॅल्प कोरडे होऊ शकते. याव्यतिरिक्त त्वचेतील ओलावा देखील कमी झाल्यास डोक्याची त्वचा कोरडी होते. हवामानातील बदलामुळेही डोक्याच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
ड्राय स्कॅल्पमुळे या समस्या उद्भवतात
Image Credit : Getty

ड्राय स्कॅल्पमुळे या समस्या उद्भवतात

ड्राय स्कॅल्पच्या (how to treat dry scalp natural hair) समस्येमुळे डोक्याच्या त्वचेला खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचेचे पापुद्रे निघणे यासारख्या समस्या उद्भवतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही नैसर्गिक उपाय करू शकता. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

(Benefits Of Ghee For Hair : केसांना तूप लावल्यास मिळतील हे 9 फायदे)

37
ऑलिव्ह ऑइल
Image Credit : Getty

ऑलिव्ह ऑइल

रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलने स्कॅल्पचा मसाज करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा. ऑलिव्ह ऑइलमुळे स्कॅल्प व केसांना मॉइश्चराइझर मिळेल. ड्राय स्कॅल्पची (home remedies for dry scalp and dandruff) समस्या दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

(रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्यास मिळतील हे अद्भुत लाभ)

47
बदामाचे तेल
Image Credit : Getty

बदामाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी स्कॅल्प व केसांना बदामाचे तेल लावा. हलक्या हाताने स्कॅल्पचा मसाज करावा. आयुर्वेदिक उपचारांमध्ये बदामाच्या तेलाचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे तेल त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सोरायसिस, एक्झिमा आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केला जातो. कारण या तेलामुळे त्वचेला ओलावा (moisturizer for dry scalp) मिळतो.

(सावधान! आंघोळ करताना तुम्हीही करताय या चुका?)

57
कोरफड
Image Credit : Getty

कोरफड

घरात कोरफडीचे रोप (best dry scalp treatment) असेल तर त्याचे एक पान कापून त्यातील गर एका वाटीमध्ये काढा किंवा आयुर्वेदिक दुकानातून कोरफडीचे जेल आणावे. कोरफडीचा गर केस आणि स्कॅल्पवर लावा व काही मिनिटे मसाज करा. १० ते १५ मिनिटे जेल केसांमध्ये राहू द्यावे. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा. कोरफडीमध्ये नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझिंगचे गुण असतात, ज्यामुळे त्वचेतील (overnight dandruff treatment) ओलावा टिकून राहतो.

67
मेथीचे दाणे
Image Credit : Getty

मेथीचे दाणे

कपभर पाण्यात दोन चमचे दाणे मेथीचे रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे दाणे मिक्सरमध्ये वाटा व त्याची पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट स्कॅल्प व संपूर्ण केसांवर लावा. 30 मिनिटांनंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. मेथीच्या दाण्यांमुळे कोरड्या स्कॅल्पची (dry scalp vs dandruff) समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

77
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

HS
Harshada Shirsekar

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Healthy Samosa Recipe : घरच्याघरी बनवा हेल्दी समोसा, वाचा सोपी रेसिपी सविस्तर
Recommended image2
मिनिमल डिझाइन्सचे Gold Anklet, खुलेल पायांचे सौंदर्य
Recommended image3
Diabetes Snacks : शेंगदाणे की पॉपकॉर्न? शुगरच्या रुग्णांसाठी कोणता स्नॅक बेस्ट आहे, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
Recommended image4
Horoscope 2nd November 2026 : जोडीदारासोबत आजचा दिवस मस्त जाईल! पाहा तुमचं राशीभविष्य काय सांगतंय
Recommended image5
Toothpaste Brands : कोलगेट, क्लोजअप, ओरल-बी... हे सगळे भारतीय ब्रँड्स आहेत असं तुम्हाला वाटतं का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved