Marathi

वेळीच बदला या सवयी

निरोगी आरोग्यासाठी दररोज आंघोळ करणं गरजेचं आहे. पण काहीजण आंघोळ करताना कित्येक चुका करतात. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. कोणत्या चुका करणं टाळणे गरजेचं आहे? जाणून घेऊया माहिती...

Marathi

किती वेळा आंघोळ करताय?

काही लोकांना दिवसातून 3-4 वेळा आंघोळ करण्याची सवय असते, जे शरीरासाठी योग्य नसते. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते.

Image credits: Getty
Marathi

टॉवेल न धुणे

आंघोळ केल्यानंतर टॉवेल रोजच्या रोज स्वच्छ धुणे आवश्यक आहे. टॉवेल न धुतल्यास कित्येक आजारांची लागण होऊ शकते. उदा. नखांचा संसर्ग, त्वचेला खाज येणे इत्यादी.

Image credits: Getty
Marathi

लुफा स्वच्छ न करणे

काही लोकांना आंघोळ करताना लुफा वापरण्याची सवय असते. पण लुफाची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास त्यावर हानिकारक रोगजंतू जमा होण्याची शक्यता असते.

Image credits: Getty
Marathi

चुकीचा साबण वापरणे

आंघोळीसाठी अँटी-बॅक्टेरिअल साबणाचा वापर करणं टाळा. कारण यामुळे त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचा खात्मा होतो.म्हणून मॉइश्चराइझरयुक्त व मऊ साबणाचा वापर करावा.

Image credits: Getty
Marathi

बादली करावी स्वच्छ

काही लोक आंघोळीची बादल व मग धुण्याचाही कंटाळा करतात. यामुळे जीवघेण्या बॅक्टेरियांची पैदास होऊ शकते. हे बॅक्टेरिया आंघोळ करताना तुमच्या शरीराच्या संपर्कात आल्यास आपण आजारी पडू शकता.

Image credits: Getty
Marathi

केस गळणे

आंघोळीनंतर लगेचच केस धुण्याची चूक करू नका. यामुळे स्कॅल्पवर नैसर्गिकरित्या स्त्राव होणाऱ्या तेलावर दुष्परिणाम होतो व केस कोरडे होऊ लागतात. यामुळे केसगळतीची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Getty
Marathi

गरम पाण्याने आंघोळ करताय?

कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करणं टाळावे. यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेलावर परिणाम होऊन कोरड्या त्वचेची समस्या उद्भवते. हे नुकसान टाळण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty