Benefits Of Ghee For Hair : केसांना तूप लावल्यास मिळतील हे 9 फायदे
- FB
- TW
- Linkdin
)
केस होतील मऊ
केसांना तूप लावल्यास केस मऊ होण्यास मदत मिळू शकते. कारण तुपामध्ये फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्सचाही साठा मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो.
कोंड्याची समस्या होते कमी
तुपामधील औषधी गुणधर्म स्कॅल्पवर होणारे बुरशीजन्य संसर्ग (Infection) रोखण्यासाठी मदत करतात. योग्य पद्धतीने केसांवर तूप लावल्यास टाळूवरील इंफेक्शन व कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.
(रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्यास मिळतील हे अद्भुत लाभ)
केसांचा पोत सुधारतो
‘व्हिटॅमिन ई’चा उत्तम स्त्रोत म्हणजे तूप. या घटकामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत मिळते. तसंच ‘व्हिटॅमिन ई’मुळे केसांमधील केरेटिन हे प्रोटीन देखील वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे केस मजबूत होतात.
(महिनाभर Aloe Vera ज्युस प्यायल्यास शरीरात काय होऊ शकतात बदल?)
केसांमधील गुंता होतो कमी
तुपातील पोषण तत्त्वांमुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो. यामुळे केसांचा पोत सुधारतो आणि केस मऊ होतात. ज्यामुळे केसांचा गुंता होत नाही.
केसांची होते वाढ
केसांच्या वाढीसाठीही तूप अतिशय लाभदायक ठरू शकते. कारण यामध्ये व्हिटॅमिन -ए व व्हिटॅमिन ई यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. जे केसांच्या वाढीसाठी पोषक मानले जाते.
दुभंगलेल्या केसांपासून सुटका
केस कोरडे असल्यास दुभंगलेल्या केसांची समस्या निर्माण होऊ शकते. यावर उपाय म्हणून आपण केसांसाठी तुपाचा वापर करू शकता. कारण यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन केस मऊ होतील.
केस होतील मजबूत
केस मुळासकट मजबूत व्हावेत, यासाठी हेअर केअर रुटीनमध्ये तुपाचा समावेश करून पाहा. कारण तुपामध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे केसांमधील केरेटिन प्रोटीन वाढण्यास मदत मिळते. केस मजबूत होण्याच्या प्रक्रियेत केरेटिन नावाचे प्रोटीन महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते.
तुपामुळे केसांचे होणारे नुकसान
तुपामुळे केसांना अगणित लाभ मिळू शकतात, यात कोणतीही शंका नाही. पण तुपाचा आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात वापर केल्यास नुकसान होण्याचीही शक्यता आहे. जास्त प्रमाणात तूप लावल्यास टाळूची त्वचा व केस अधिक प्रमाणात तेलकट होऊ शकतात. यामुळे मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते. अॅलर्जी असल्यास तुपाचा वापर करू नये.
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.