Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या ५ सोप्या आरती, मिळेल बाप्पांचा आशीर्वाद
Ganpati Aarti : उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.अशातच घरी आलेल्या बाप्पाची आरती करताना तुमच्या पुढील काही आरती तोंडपाठ असायला हव्यात. जेणेकरुन बाप्पाचा आशीर्वाद मिळेल.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥०१॥
मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया ॥०२॥
तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला ॥०३॥
तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥
मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरयो ॥
गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥
सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ।
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता ।
अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे ।
चरणी ठेवितो माथा ॥०१॥
पहा झाले पुरे एक वर्ष ।
होतो वर्षानं एकदा हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श ।
घ्यावा संसाराचा परामर्ष ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची ।
वाचावी कशी मी गाथा ॥०२॥
आली कशी पहा आज वेळ ।
कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गूळ-फुटाणे खोबरं नि केळं ।
साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण ।
तूच पिता तूच माता ॥०३॥
नाव काढू नको तांदुळाचे ।
केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घराचे ।
दिन येतील का रे सुखाचे ।
देवा जाणुनि गोड मानुनि ।
द्यावा आशीर्वाद आता ॥०४॥
शेंदुर लाल चढ़ायो
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को ।
महिमा कहे न जाय लागत हूं पद को ।
जय देव जय देव ॥०१॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जय देव जय देव ॥०२॥
भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे ।
जय देव जय देव ॥०३॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जय देव जय देव ॥०४॥

