MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Ganesh Chaturthi 2025 : मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ, कुठे आणि कसे पोहोचाल घ्या जाणून

Ganesh Chaturthi 2025 : मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ, कुठे आणि कसे पोहोचाल घ्या जाणून

हिंदू धर्मात गणपतीची बुद्धिची, समृद्धीची देवता मानले जाते. यंदा गणेशोत्सवाचा सण उद्यापासून सुरु होणार आहे. गणेशोत्सवाची धूम मुंबईत दिसून येते. अशातच मुंबईतील काही प्रसिद्ध गणेश मंडळांसह तेथील गणपती पाहण्यासाठी कसे पोहोचायचे याबद्दल जाणून घेऊया....

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Aug 26 2025, 08:43 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
फोर्टचा राजा
Image Credit : Facebook

फोर्टचा राजा

मुंबईतील फोर्ट येथे 50 वर्षांहून अधिक काळ गणपतीची स्थापना करणारे मंडळ आहे. फोर्टचा राजा मुंबईत प्रसिद्ध गणपतींपैकी एक आहे. गणेशोत्सवावेळी दूरदूरवरुन भाविक फोर्टच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात.

कुठे : फोर्ट, मुंबई

कसे पोहोचाल : द्वारकादास एलएन, बोराबाजार परिसर, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र 400001

27
खेतवाडी
Image Credit : Facebook

खेतवाडी

मुंबईतील खेतवाडीच्या गल्ल्यांमध्ये गणपतींचे दर्शन घेता येईल. खेतवाडीचा गणराज, खेतवाडीचा एकवीसमुखी गणपती, खेतवाडीचा मोरया असे काही गणपती तुम्हाला पहायला मिळतील. भव्य दिव्य गणपतींची मुर्ती पहायची असल्यास नक्कीच खेतवाडींच्या गणपतींचे दर्शन घेऊ शकता.

कुठे : खेतवाडी

कसे पोहोचाल : ग्रँट रोड खेतवाडी मागील रस्ता आणि 12वी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Related Articles

Related image1
Ganpati Rangoli : बाप्पाच्या आगमनासाठी दारापुढे काढा या 5 सुंदर रांगोळी
Related image2
Ganesh Chaturthi 2025: गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?
37
परेलचा राजा, नरे पार्क
Image Credit : Instagram

परेलचा राजा, नरे पार्क

परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क, परळचा राजा‘ ही संस्था यावर्षी 79 वे वर्ष साजरे करत आहे. सन 1947 साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली होती. लालबाग-परळ भागात परेलच्या राजाचे दर्शन घेता येईल.

कुठे : नरे पार्क, परळ

कसे पोहोचाल : अभय शिका, भिवाजी राव नरे उद्यान, नरे पार्क, परळ (पूर्व), मुंबई – ४००१२

47
मुंबईचा राजा, गणेशगल्ली
Image Credit : Social Media Platform X

मुंबईचा राजा, गणेशगल्ली

वर्ष 1928 रोजी लालबाग सर्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरुची चाळ येथे केली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस साजरा केला जायचा. पण आज दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. मुंबईतील राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. लालबागच्या परिसरात असणाऱ्या मुंबईच्या राजासाठी भव्यदिव्य आरास केली जाते.

कुठे : लालबाग

कसे पोहोचाल : 1, गणेश नगर Ln, लालबाग, परळ, मुंबई, महाराष्ट्र 400012

57
जी. एस. बी. सार्वजनिक गणेशोत्सव समिती
Image Credit : Social media

जी. एस. बी. सार्वजनिक गणेशोत्सव समिती

मुंबईतील वडाळा येथील सर्वाधिक श्रीमंत आणि सोन्याने मढलेल्या गणपतीमध्ये जी.एस.बी गणपतीची ओखळ आहे. गणपतीची मुर्ती आकर्षक असून डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या आभूषणांनी नटलेली दिसते. 

कुठे : वडाळा, मुंबई

कसे पोहोचाल : द्वारकानाथ भवन, श्री राम मंदिर परिसर, कात्रक रोड, वडाळा, मुंबई - 400031

67
अंधेरीचा राजा
Image Credit : Facebook

अंधेरीचा राजा

नवसाला पावणारा अंधेरीचा राजा मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांपैकी एक आहे. अंधेरीच्या राजाला विराजमान करण्यासाठी मोठी आरास केली जाते. या मंडळाकडून लाइव्ह दर्शन देखील करू शकता.

कुठे : अंधेरी

कसे पोहोचाल : आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, गणेश मैदान, आझाद नगर II, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400053

77
चिंतामणी
Image Credit : Instagram Chintamani Page

चिंतामणी

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन ते विसर्जनाची मोठी धूम लालबाग-चिंचपोकळीच्या परिसरात पहायला मिळते.

कुठे : चिंचपोकळी

कसे पोहोचाल : दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी, मुंबई, महाराष्ट्र 400012. चिंचपोकळी रेल्वे स्थानकाबाहेरच चिंतामणी गणपतीचे मंडळ आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
गणेशोत्सव 2025

Recommended Stories
Recommended image1
बाळांची २०२६ मध्ये ठेवता येतील हि नवे, ऑप्शन घ्या जाणून
Recommended image2
BF सोबत डेटवर घाला 7 हार्ट शेप इयररिंग्स, मन जिंकाल
Recommended image3
ऑफिसमध्ये दिसा 'क्लासी' आणि 'प्रोफेशनल'! साध्या लुकलाही श्रीमंती थाट देणारे ६ स्टायलिश सिल्वर कडा डिझाइन्स
Recommended image4
लग्नसराईत मिरवा शाही थाटात! कमी किमतीत सोन्यालाही मात देतील १ ग्रॅम सोन्याच्या 'या' सुंदर बांगड्या; पाहा फोटो
Recommended image5
वर्ष २०२५मध्ये व्हायरल होणारे ५ इअरिंग, जाणून घ्या माहिती
Related Stories
Recommended image1
Ganpati Rangoli : बाप्पाच्या आगमनासाठी दारापुढे काढा या 5 सुंदर रांगोळी
Recommended image2
Ganesh Chaturthi 2025: गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved