Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायकाच्या 8 गणपतींच्या मंदिरांची वाचा अख्यायिका
- FB
- TW
- Linkdin
मयुरेश्वर, मोरगाव
मोरगावात असणारा मयुरेश्वर हा अष्टविनायक गणपतींपैकी पहिला गणपती आहे. गणपतीचे हे स्वयंभू आद्यस्थान आहेय. या ठिकाणी गणपतीने मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी अख्यायिका आहे. यामुळेच गणपतीचे नाव मयुरेश्वर पडले आहे. या मंदिराचे चार दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाचे प्रतीक मानले जाते.
श्री बल्लाळेश्वर, पाली
रायगड जिल्ह्यातील पाली गावात बाल्लाळेश्वराचे सुंदर असे मंदिर आहे. गणपतीचा भक्त बल्लाळच्या नावावरुन या गणेशाचे नाव बल्लाळेश्वर ठेवण्यात आले आहे. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसह जंगलात फेकून देण्यात आले होते. यावेळी गणपतीचे स्मरण करत बल्लाळावर गणपती प्रसन्न होत त्याला दर्शन दिले. याशिवाय पुढील अनेक वर्षे पालीतच राहणार असल्याचेही बल्लाळेश्वरला गणपतीने सांगितले. तोच हा पालीचा बल्लाळेश्वर.
श्री वरदविनायक, महड
रायगड जिल्ह्यातीस महड गावात अष्टविनायक गणपतींपैकी चौथा गणपती आहे. हा वरविनायक नवसाला पावणारा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती देखील आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिलते. या मंदिराच्या चहूबाजूंना चार हत्ती आहेत.
श्री चिंतामणी, थेऊर
पुणे जिल्ह्यातीस थेऊरमध्ये श्री चिंतामणीचे मंदिर आहे. मूळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम या मंदिराच्या येथे होतो. मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेचा असणारा श्री चिंतामणी गणपती त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. या मंदिराच्या परिसरात रमाबाई पेशवे यांची समाधीही आहे.
श्री गिरिजात्मक, लेण्याद्री
पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. डोंगरावर असणारे हे अष्टविनायक मंदिरांपैकी एकमेव मंदिर आहे. हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे. गिरिजा हे देवी पार्वतीचे नाव असून तिचा पुत्र आत्मज म्हणून गजाननाचे हे मंदिर आहे. मोठ्या काताळामध्ये हे मंदिर कोरण्यात आले आहे. मंदिराला 300 पायऱ्या असून डोंगरात 18 बौद्धगुहा आहेत. त्यापैकी आठव्या गुहेमध्ये गिरिजात्मकाचे मंदिर आहे.
श्री महागणपती, रांजणगाव
पुणे जिल्ह्यातील रांजणगावात श्री महागणपतीचे मंदिर आहे. गणपतीचे सर्वाधिक शक्तिशाली महागणपतीचे रुप येथे पहायला मिळते. याशिवाय मंदिरात रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती देखील आहेत. गजाननाच्या रुपाला महोत्कट असेही म्हटले जाते. या गणपतीला 10 सोंड व 20 हात आहेत. श्री महागणपतीला पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
विघ्नेश्वर, ओझर
अष्टविनायकमधील सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावात आहे. श्री विघ्नेश्वराच्या मंदिराल सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीने विघ्नासुर नावाच्या असुराचा वध केला होता. म्हणून गपणतीचे नाव विघ्नेश्वर असे पडले आहे अशी अख्यायिका सांगितली जाते.
श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक
अहमदनगरमधील सिद्धटेक येथे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणून श्री सिद्धिविनायकाचे नाव घेतले जाते. या गणपतीसंदर्भात एक पौराणिक कथा आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांसोबत भगवान विष्णूंचे युद्ध सुरु होते. अनेक वर्ष हे युद्ध सुरु होते. युद्धात विष्णूंना यश मिळत नव्हते. म्हणून भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचे स्मरण करण्यास सांगितले. त्यानंतर विष्णूंनी मधु आणि कैटभ राक्षसांचा सिद्धटेक येथे वध केला. यामुळेच मंदिरात भगवान विष्णूंचीही मूर्ती पहायला मिळते. हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. या मूर्तीची उंची 3 फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे.
आणखी वाचा :
श्रावणातील शनिवारी करा हे 5 उपाय, राहु-केतूसंबंधित सर्व समस्या होतील दूर
Nag Panchami च्या दिवशीच उघडले जातात 'या' मंदिराचे दरवाजे, वाचा अख्यायिका