Best Hair Color for Skin Tone: हेअर कलर निवडताना फक्त ट्रेंड्स नाही, तर तुमचा स्किन टोन आणि अंडरटोनही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. योग्य हेअर कलर निवडल्यास तुमचा संपूर्ण लूक बदलू शकतो, तर चुकीच्या शेडमुळे तुमचं सौंदर्य कमी दिसू शकतं.

Hair Color According to Skin Tone: आजकाल हेअर कलरिंग म्हणजे फक्त पांढरे केस लपवणं राहिलेलं नाही, तर ते आता प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी आणि स्टाईलचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. अनेक जण नवीन आणि अट्रॅक्टिव्ह लूक मिळवण्यासाठी वेगवेगळे हेअर कलर्स ट्राय करतात. पण अनेकदा मुली आपल्या स्किन टोनला मॅच होणारा कलर निवडण्याऐवजी कोणताही ट्रेंडिंग कलर निवडतात, ज्यामुळे त्यांचा लूक पूर्णपणे बिघडतो. त्यामुळे केसांना कलर करताना नेहमी आपल्या स्किन टोनची काळजी घेणं गरजेचं आहे.

प्रत्येकाचा स्किन टोन वेगवेगळा असतो. काही जण गोरे असतात, काही गव्हाळ, तर काही सावळे. आपल्या स्किन टोनला जुळणारा हेअर कलर निवडल्यास तुमचा ओव्हरऑल लूक अधिक चांगला दिसतो. पण चुकीची शेड निवडल्यास तुमचं सौंदर्य कमी दिसू शकतं. म्हणूनच, केसांना कलर करण्यापूर्वी, तुमच्या स्किन टोनवर कोणती शेड सर्वात चांगली दिसेल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला, या लेखात जाणून घेऊया की तुमच्या स्किन टोनसाठी कोणता रंग सर्वोत्तम आहे.

गोऱ्या रंगाच्या त्वचेसाठी हेअर कलर

जर तुमचा स्किन टोन गोरा असेल, तर तुमच्यावर अनेक प्रकारचे हेअर कलर्स चांगले दिसू शकतात. लाईट ब्राऊन, गोल्डन ब्लॉन्ड, हनी ब्लॉन्ड, ॲश ब्राऊन आणि कॉपर शेड्स गोऱ्या त्वचेवर विशेषतः छान दिसतात. या शेड्समुळे चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. मात्र, खूप डार्क रंग निवडल्यास चेहरा डल दिसू शकतो, म्हणून गोऱ्या त्वचेच्या लोकांनी सॉफ्ट आणि वॉर्म टोन्स निवडायला हवेत.

गव्हाळ रंगाच्या त्वचेसाठी हेअर कलर

भारतीयांमध्ये गव्हाळ रंगाची त्वचा सर्वात सामान्य आहे. या स्किन टोनवर चॉकलेट ब्राऊन, कॅरमल ब्राऊन, चेस्टनट, बरगंडी आणि महोगनी यांसारख्या शेड्स खूप छान दिसतात. हे रंग केसांना नॅचरल लूक देतात आणि चेहऱ्याचा टोन बॅलन्स करतात. गव्हाळ रंगाच्या त्वचेच्या लोकांनी खूप हलके ब्लॉन्ड रंग टाळावेत, कारण त्यामुळे लूक अननॅचरल दिसू शकतो.

सावळ्या रंगाच्या त्वचेसाठी हेअर कलर

सावळ्या रंगाच्या त्वचेवर डार्क आणि रिच शेड्स सुंदर दिसतात. उदाहरणार्थ, डार्क ब्राऊन, बरगंडी, वाईन रेड, कॉफी ब्राऊन आणि महोगनी. हे रंग स्किन टोनसोबत एक चांगला कॉन्ट्रास्ट तयार करतात आणि लूकला अधिक आकर्षक बनवतात. खूप हलके किंवा ॲश टोन असलेले रंग सावळ्या त्वचेवर तितके चांगले दिसत नाहीत, त्यामुळे डार्क आणि वॉर्म शेड्स निवडणं उत्तम ठरतं.

स्किनचा अंडरटोन समजून घेणंही गरजेचं

फक्त स्किन टोनच नाही, तर हेअर कलर निवडण्यात स्किनच्या अंडरटोनचीही महत्त्वाची भूमिका असते. जर तुमचा स्किन अंडरटोन वॉर्म असेल, तर गोल्डन, हनी, कॅरमल आणि कॉपर यांसारख्या शेड्स चांगल्या दिसतात. तर कूल अंडरटोन असलेल्यांसाठी ॲश ब्राऊन, प्लॅटिनम किंवा कूल रेड शेड्स अधिक योग्य ठरू शकतात.

हेअर कलर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा

हेअर कलर निवडताना, तुमच्या स्किन टोनसोबतच तुमच्या केसांची क्वालिटी आणि मेंटेनन्सकडेही लक्ष द्या. खूप जास्त प्रयोग करण्याऐवजी, अशी शेड निवडा जी नॅचरल दिसेल आणि जिची देखभाल करणं सोपं असेल. जर तुम्ही गोंधळलेले असाल, तर हेअर एक्सपर्टचा सल्ला घेणं फायद्याचं ठरू शकतं.