MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Fatty Liver Symptoms : फॅटी लिव्हरची ही 5 लक्षणं अजिबात इग्नोर करू नका

Fatty Liver Symptoms : फॅटी लिव्हरची ही 5 लक्षणं अजिबात इग्नोर करू नका

आजकाल फॅटी लिव्हरची समस्या खूप कॉमन झाली आहे. लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्याने हा आजार होतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 17 2026, 04:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
फॅटी लिव्हरची लक्षणं इग्नोर करू नका
Image Credit : Getty

फॅटी लिव्हरची लक्षणं इग्नोर करू नका

फॅटी लिव्हर हा आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणं दाखवत नाही. पण हळूहळू तो लिव्हरवर ताण देतो. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष केल्यास फायब्रोसिस आणि सिरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज
Image Credit : Getty

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज

फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत. पहिला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि दुसरा नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस. दारू न पिताही लिव्हरवर चरबी जमा होते, त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेझिस्टन्स ही याची मुख्य कारणं आहेत.

Related Articles

Related image1
Breakup Psychology : एखाद्याला विसरणं इतकं कठीण का असतं? सायकोलॉजी काय सांगते?
38
नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीसचा धोका
Image Credit : Getty

नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीसचा धोका

नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (NASH) ही खूप गंभीर स्थिती आहे. यामध्ये लिव्हरच्या पेशी खराब होतात आणि सूज येते. यामुळे सिरोसिसचा धोका वाढतो. फॅटी लिव्हरची काही सामान्य लक्षणं आपण अनेकदा इग्नोर करतो, ती कोणती ते जाणून घेऊया.

48
सतत थकवा जाणवणं
Image Credit : Getty

सतत थकवा जाणवणं

सतत थकवा आणि ऊर्जेची कमतरता हे फॅटी लिव्हरचं पहिलं लक्षण आहे. लिव्हरवर ताण आल्याने ते पोषक घटक नीट प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटू शकतं.

58
विनाकारण वजन वाढणं
Image Credit : Getty

विनाकारण वजन वाढणं

विनाकारण वजन वाढणं हे फॅटी लिव्हरचं आणखी एक लक्षण आहे. फॅटी लिव्हरचा थेट संबंध इन्सुलिन रेझिस्टन्सशी असतो. यामुळे पोटावर चरबी साचते, जी डाएट किंवा व्यायामानेही सहजासहजी कमी होत नाही.

68
पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं
Image Credit : Getty

पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं

पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा किंवा अस्वस्थता जाणवणं हे फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं. लिव्हरचा आकार थोडा वाढल्यामुळे बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला जडपणा किंवा दुखल्यासारखं वाटू शकतं.

78
विस्मरण आणि एकाग्रतेचा अभाव
Image Credit : Getty

विस्मरण आणि एकाग्रतेचा अभाव

लिव्हरचं काम बिघडल्याने शरीरात विषारी घटक साचू लागतात. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे तुम्हाला विस्मरण होऊ शकतं किंवा एखाद्या कामात लक्ष केंद्रित करायला त्रास होऊ शकतो.

88
त्वचेवर काळे डाग पडणं
Image Credit : Getty

त्वचेवर काळे डाग पडणं

त्वचेवर काळे डाग पडणं हे फॅटी लिव्हरचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. मान, काख किंवा कोपरावर मखमलीसारखे काळे डाग दिसू लागतात. हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण असू शकतं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Poha Cutlet Recipe: दुकानासारखे कुरकुरीत पोह्यांचे कटलेट घरीच बनवा, पाहा सोपी रेसिपी
Recommended image2
Durga Puja 2026: पुष्पांजली ते पेंडॉल हॉपिंग, मधुमेहींनी या दुर्गापूजेत पायांची काळजी कशी घ्यावी? १० टिप्स
Recommended image3
Jeans Rivets : जीन्सच्या खिशावर ही छोटी बटणं का असतात माहितीये का?
Recommended image4
Navratri 2026: नवरात्रीत कमी बजेटमध्ये दिसा स्टायलिश, ट्राय करा या ७ गरबा आउटफिट आयडिया!
Recommended image5
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पनीर की सोया चंक्स? काय आहे जास्त फायदेशीर?
Related Stories
Recommended image1
Breakup Psychology : एखाद्याला विसरणं इतकं कठीण का असतं? सायकोलॉजी काय सांगते?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved