FasTag संदर्भातील हे काम आजच करा, अन्यथा होईल मोठे नुकसान

| Published : Feb 27 2024, 04:56 PM IST / Updated: Feb 27 2024, 04:59 PM IST

paytm fastag

सार

नॅशनल हायवे ऑफ इंडियाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठीच्या तारखेत बदल करत 29 फेब्रुवारीपर्यंतची मूदत दिली आहे. अशातच युजर्सला फास्टॅग केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया फास्टॅग अपडेट करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत सविस्तर...

FasTag KYC Update Process :  फास्टॅग युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाने “एक वाहन एक फास्टॅग” (One vehicle one fastag) प्रोग्राम लाँच केला आहे. यामुळे टोल वसूल करणे सोयीस्कर होणार आहे. अशातच युजर्सला आपले केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. याची अखेरची तारीख 29 फेब्रुवारी देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने असे करा KYC अपडेट

तुम्हाला फास्टॅग केवायसी करायचे असल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. जाणून घेऊया ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम फास्टॅगची अधिकृत वेबसाइट fastag.ihmcl.com येथे भेट द्या.
  • येथे डॅशबोर्डच्या My Profile वर क्लिक करा.
  • आता KYC ऑप्शन तुम्हाला दिसेल.
  • Customer ID वर क्लिक करा.
  • Declaration Box वर क्लिक करत केवायसी अपडेटच्या प्रोसेससाठी पुढे जा.
  • येथे महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागणार आहेत.
  • सर्व माहिती व्यवस्थितीत भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासून पाहा आणि Submit वर क्लिक करा.

ऑफलाइन प्रोसेस पुढीलप्रमाणे

  • ऑफलाइन फास्टॅग केवायसीसाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार आहे. येथे तुम्हाला पॅन कार्ड, घरचा पत्त्याचे प्रुफ, पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत घेऊन जावे लागणार आहे.
  • बँकेतून तुम्हाला फास्टॅग केवायसी फॉर्म घ्यावा लागेल.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे बँकेत द्या.
  • बँकेकडून तुम्ही सादर केलेली कागदत्रे पडताळून पाहिली जातील.
  • तुम्हाला ईमेल किंवा मेसेजच्या माध्यामातून फास्टॅग केवायसी अपडेट झाल्याचे नोटिफिकेशन येईल.

असे तपासून पाहा फास्टॅग स्टेटस

फास्टॅग तपासून पाहण्यासाठी fastag.ihmcl.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता रजिस्टर मोबाइल क्रमांकावरुन लॉग इन करा. My Profile वर जाऊन केवायसी स्टेटस पाहू शकता. जर तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर नसल्यास तुम्ही My FasTag App डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करत केवायसी स्टेटस तपासून पाहू शकता.

आणखी वाचा : 

MWC 2024 : मोटोरोला कंपनीचा हा स्मार्टफोन पाहिलात का? हातात घड्याप्रमाणेही घालता येणार

MWC 2024 आधी Xiaomi ने लाँच केले हे धमाकेदार प्रोडक्ट्स, जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

पगारासाठी वापरला जाणारा 'सॅलरी' शब्द नक्की कोठून आलाय? जाणून घ्या इतिहास