सार
स्पेनमधील बार्सोलोना येथे जगातील सर्वाधिक मोठा टेक इवेंट सुरू आहे. यामध्ये प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. अशातच मोटोरोला कंपनीने स्मार्ट वॉच प्रमाणे घालता येईल असा फोन लाँच केला आहे.
MWC 2024 : जगातील सर्वाधिक मोठा टेक इवेंट मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024 चे आयोजन स्पेनमधील बार्सोलोना येथे करण्यात आले आहे. या इवेंटमध्ये टेक जगातील प्रसिद्ध कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. अशातच मोटोरोला (Motorola) कंपनीने इवेंटमध्ये एक फोल्डेबल फोन (Foldable Phone) लाँच केला आहे.
मोटोरोलाचा फोल्डेबोल स्मार्टफोन
मोटोरोला कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन ‘शेप शिफ्टिंग’ (Shape Shifting) नावाने लाँच केला आहे. स्मार्टफोन अन्य स्मार्टफोनप्रमाणे एका दिशेने फोल्ड होतो. या फोनला 6.9 इंचाचा डिस्प्ले दिला गेलाय. स्मार्टफोन फोल्ड होत असल्याने तुम्हाला घड्याळाप्रमाणे वापर करता येणार आहे.
स्मार्टफोनचे फीचर्स
मोटोरोलाच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्सच्या माध्यमातून आउटिंग मॅचिंग वॉलपेपर सेट करता येणार आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 6.9 इंचाचा FHD+pOLED डिस्प्लेसह काही वेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये मागील बाजूस फोल्ड होऊ शकतो.
आणखी वाचा :
MWC 2024 आधी Xiaomi ने लाँच केले हे धमाकेदार प्रोडक्ट्स, जाणून घ्या किंमतीसह फीचर्स
जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO
Spam Calls मुळे त्रस्त आहात? दूर राहण्यासाठी ही सोपी ट्रिक येईल कामी