घरच्याघरी या 5 सोप्या स्टेप्स फॉलो करुन करा Face Clean Up, पार्लरचा खर्चही वाचेल
- FB
- TW
- Linkdin
कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा
चेहरा क्लिनअप करण्याआधी सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर सॉफ्ट कापडाच्या टॉवेलने चेहरा व्यवस्थितीत पुसून घ्या.
चेहऱ्याला स्टिम द्या
चेहरा धुतल्यानंतर 5 मिनिटे स्टीमरच्या माध्यमातून वाफ घ्या. आता फेशिअल टिश्यूच्या मदतीने चेहरा पुसून घ्या. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. थोड्यावेळाने बर्फाने चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरील पोर्स घट्ट होण्यासह चेहऱ्याचे तापमान सामान्य होईल.
स्क्रब करा
चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्क्रब करणेही महत्वाचे आहे. यासाठी गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये थोडेसे दही आणि लिंबूचा रस मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावण्यासह हलक्या हाताने त्वचेवर स्क्रब करा.
फेस पॅक लावा
चेहऱ्यावर स्क्रब लावल्यानंतर फेस पॅक लावावा. मॉइश्चराइजिंग फेस पॅकमुळे त्वचेला ग्लो येण्यासह मऊ होते. याशिवाय स्किन टोनही सुधारला जातो. यामुळे त्वचेनुसार फेस पॅक ट्राय करा.
टोनरचा वापर
चेहऱ्यावर 10-15 फेस पॅक लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याचे चेहरा धुवा. पुन्हा चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर टोनर लावा. टोनर लावल्याने त्वचेवरील पीएचचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फेस क्लिनअपचे फायदे
- फेस क्लिनअप केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. -त्वचेवरील डेड स्किन, घाण-धूळ माती देखील निघून जाते.
- चेहऱ्यावर ग्लो येण्यासह फ्रेश दिसतो
- त्वचा चिरतरुण दिसण्यासाठी क्लिनअप करणे फायदेशीर ठरेल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
रक्षाबंधनसाठी 2K मध्ये खरेदी करा हे 8 ट्रेंडी सलवार सूट, दिसाल सुंदर
श्रावणातील 5 सोमावारी या रंगांचे वस्र करा परिधान, मिळेल पूजेचे फळ